Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल सेवा खोळंबली, सुट्टीमुळे घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल

Last Updated:

मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे.

Mumbai Local
Mumbai Local
Mumbai Local News : मुंबई लोकलने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी मोठी बातमी समोर आली आहे. पश्चिम रेल्वे मार्गावरील लोकल सेवा विस्कळीत झाल्याची घटना घडली आहे. आज संध्याकाळच्या सुमारास विद्युत पुरवठा बंद झाल्याने ही घटना घडल्याची माहिती आहे. या घटनेने प्रवाशांचे प्रचंड हाल झाले आहे.
advertisement
पश्चिम रेल्वेच्या विरार रेल्वे स्थानकाजवळ विद्युत पुरवठा बंद झाल्याची घटना घडली आहे.त्यामुळे डहाणू पर्यंत धावणाऱ्या लोकल सेवेवर परिणाम झाला आहे. विरार आणि वैतरणा दरम्यान विद्युत पुरवठा बंद झाल्याने लोकलसेवा खोळंबली होती. यामुळे डहाणूसाठी 3:45 ची सुटलेली लोकल वैतरणा रेल्वे स्थानकाजवळ अडकून पडली आहे. त्यामुळे डहाणूपर्यंत धावणाऱ्या लोकलचा खोळंबा झाला आहे. आणि लांब पल्यांच्या गाड्यांवर याचा परिणाम झाला आहे.त्यामुळे प्रवाशांना ताटकळत रेल्वे स्थानकार उभं रहावं लागत आहे.
advertisement
खरं तर आज रविवार सुट्ट्यांचा दिवस असल्याने मोठ्या प्रमाणात प्रवासी घराबाहेर पडले होते. दिवाळीची शॉपिंग करण्यासाठी देखील अनेक कुटुंब घराबाहेर पडले होते.  या प्रवाशांना आता लोकलसेवा विस्कळीत झाल्याचा फटका बसला आहे. आता विरार आणि वैतरणा दरम्यान बंद झालेला विद्युत पुरवठा कधी सूरू होतो, हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
advertisement
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Mumbai Local : रेल्वे प्रवाशांसाठी मोठी बातमी! लोकल सेवा खोळंबली, सुट्टीमुळे घराबाहेर पडलेल्या प्रवाशांचे हाल
Next Article
advertisement
OTT Movie: बोल्ड सीन्सने भरलेला सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका; 2 तास 28 मिनिटांची कहाणी ओटीटीवर हिट
2 तास 28 मिनिटांचा बोल्ड सिनेमा, फॅमिलीसोबत चुकूनही पाहू नका
    View All
    advertisement