माणिकवाडीत जळत्या कोळशावर चालण्याची परंपरा कशी सुरू झाली? नेमकं कारण काय

Last Updated:

'इंगळ' म्हणजेच निखारा. जळत्या कोळशाच्या मार्गावरून चालण्याची परंपरा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये आहे. काळमवाडीची काळम्मादेवी, नेर्ले गावातील भैरवनाथ-जोगेश्वरी यासह माणिकवाडी या गावांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून नवरात्रीमध्ये इंगळावरून चालण्याचा विधी साजरा होतो.

+
News18

News18

'इंगळ' म्हणजेच निखारा. जळत्या कोळशाच्या मार्गावरून चालण्याची परंपरा सांगलीच्या वाळवा तालुक्यातील काही गावांमध्ये आहे. काळमवाडीची काळम्मादेवी, नेर्ले गावातील भैरवनाथ-जोगेश्वरी यासह माणिकवाडी या गावांमध्ये गेल्या शेकडो वर्षांपासून नवरात्रीमध्ये इंगळावरून चालण्याचा विधी साजरा होतो. यापैकी माणिकवाडी गावामध्ये श्री जोगेश्वरी देवीच्या मंदिरामध्ये इंगळ परंपरा कशी सुरू झाली जाणून घेवू.
माणिकवाडी गावचे रहिवाशी आणि मंदिराचे मानकरी असलेले बबन शिंदे यांनी दिलेल्या माहितीनुसार; पूर्वीचे लोक अमुक एखादी मनोकामना पूर्ण व्हावी म्हणून देवीला नवस बोलत होते. ती मनोकामना पूर्ण झाली तर ती देवीची कृपा समजली जात असे मनोकामना पूर्ण केल्याबद्दल कृतज्ञता म्हणून नवस बोलल्याप्रमाणे देवी समोर इंगळा वरून म्हणजेच जळत्या कोळशांच्या निखार्‍यावरून चालत जाऊन देवीचे दर्शन घेतले जात असे.
advertisement
इंगळा वरून चालण्याचे कार्यक्रम जाजा मंदिरांमध्ये होतात तिथे मुख्य गाभाऱ्याच्या बाहेर कमान असते. या कमानी मध्ये लाकूड पेटवून त्याचे विस्तव मार्गावर पसरले जातात. आणि परंपरेनुसार ठरलेले मानकरी त्या इंगळा वरून प्रथम चालत जाऊन देवीचे दर्शन घेतात. त्यानंतर गाव परिसरातील नवस बोललेले भाविक भक्त एकापाठोपाठ इंगळा वरून चालत देवीचे दर्शन घेतात.
advertisement
माणिकवाडीत इंगळ परंपरेची अशी झाली सुरुवात
माणिकवाडी गावामध्ये श्री जोगेश्वरी देवीचे गेल्या अनेक पिढ्यांपासून मंदिर आहे. अलीकडच्या काळात या मंदिराचा दाक्षिणात्य पद्धतीने जिर्णोद्धार केला आहे. सध्या सभामंडप, शिल्प, रंग-रंगोटीने देखणे दिसणारे मंदिर पूर्वी साध्या पत्र्याच्या शेडमध्ये पूजले जात होते. स्थानिक लोकांनी दिलेल्या माहितीनुसार; श्री जोगेश्वरी देवीसमोर बोललेली मनोकामना पूर्ण होत असे. यामुळे ग्रामस्थांसह आसपासच्या खेड्यातील लोक देखील माणिकवाडीला श्रद्धेने येत असत.
advertisement
वाळवा तालुक्यातील शिरटे गावातील एका भाविक भक्ताने देवीसमोर इंगळा वरून चालण्याचा नवस बोलला होता. भक्ताची मनोकामना पूर्ण झाली. परंतु त्यावेळी मंदिराचे रूपडे साधे असल्याने मंदिरास कमान नव्हती. तेव्हा मनोकामना पूर्ण झालेला भक्त आणि गावातील जाणकार लोकांनी पुढाकार घेत वर्गणी स्वरूपात देणगी जमा करून एका वर्षाच्या आत सुंदर दगडी कमान उभी केली. तेव्हापासून दरवर्षी नवरात्रीच्या काळामध्ये अष्टमीच्या दिवशी इंगळा वरून चालण्याची प्रथा माणिकवाडी गावामध्ये सुरू झाली.
advertisement
गावकऱ्यांच्या माहितीनुसार कोरोना महामारीचा काळ वगळता श्री जोगेश्वरी देवी समोर इंगळा वरून चालण्याची परंपरा गेल्या अनेक वर्षांपासून सुरू आहे. आजच्या आधुनिक काळात देखील ग्रामस्थांसह भाविकांचा इंगळ विधीस मोठा प्रतिसाद आहे.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
माणिकवाडीत जळत्या कोळशावर चालण्याची परंपरा कशी सुरू झाली? नेमकं कारण काय
Next Article
advertisement
Guess Who: गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती स्टार; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
गावात शेण गोळा करुन भरायचा पोट, आता करोडपती; 7 स्टार हॉटेलमध्ये करतो पार्ट्या
    View All
    advertisement