Jalgaon Accident : बाईकचा चक्काचूर, कारच्या एअरबॅग्सही उघडल्या; जळगाव-पाचोरा रस्त्यावर मृत्यू तांडव
- Published by:Shreyas
Last Updated:
जळगावमध्ये रामदेववाडी जवळ भीषण अपघात झाला आहे, या अपघातात तीन बालकांसह महिला ठार झाली आहे.
नितीन नांदुरकर, प्रतिनिधी
जळगाव : जळगावमध्ये रामदेववाडी जवळ भीषण अपघात झाला आहे, या अपघातात तीन बालकांसह महिला ठार झाली आहे. दुचाकीला भरधाव चारचाकीने जोरदार धडक दिल्यामुळे हा अपघात झाला आहे. दुचाकीवरील महिला तिच्या दोन बालकांसह एका मुलाचा जागीच जीव गेला आहे.
या अपघातात मृत्यू झालेले चारही जण एकाच कुटुंबातील आहेत. हे चारही जण रामदेववाडी गावातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे.
advertisement
या अपघातानंतर रामदेववाडी गावातील गावकरी संतप्त झाले आणि त्यांनी दगडफेक केली. गावकऱ्यांनी जळगाव-पाचोरा रस्त्यावर रास्तारोको करत वाहतूकही अडवून ठेवली. एवढच नाही तर गावकऱ्यांनी पोलिसांवरही दगडफेक केली. संतप्त जमावावर नियंत्रण मिळवण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा घटनास्थळी तैनात करण्यात आला. हा अपघात एवढा भीषण होता की कारच्या धडकेमध्ये दुचाकी पूर्णपणे चक्काचूर झाली. या अपघातात जखमी दुचाकीस्वारावर जिल्हा रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
May 07, 2024 9:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident : बाईकचा चक्काचूर, कारच्या एअरबॅग्सही उघडल्या; जळगाव-पाचोरा रस्त्यावर मृत्यू तांडव


