advertisement

Jalgaon Accident : अपघातात बसचा चुराडा, दोन ठार 15 जखमी, मुक्ताईनगरजवळ महामार्गावर भीषण अपघात

Last Updated:

Jalgaon News : मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला

News18
News18
इम्तियाज अहमद, प्रतिनिधी, मुक्ताईनगर (जळगाव) : मुक्ताईनगरजवळ राष्ट्रीय महामार्गावर आज सकाळच्या सुमारास एक भीषण अपघात झाला. ट्रॅव्हल्स आणि ट्रक यांच्यात समोरासमोर धडक होऊन झालेल्या या अपघातात दोन प्रवाशांचा जागीच मृत्यू झाला असून 15 ते 20 जण गंभीर जखमी झाले आहेत.
अपघाताची तीव्रता इतकी होती की ट्रॅव्हल्सचा समोरील भाग अक्षरशः चुराडा झाला. धडक झाल्यानंतर घटनास्थळी मोठी गर्दी जमली. स्थानिक नागरिकांनी तात्काळ मदतीसाठी पुढाकार घेत जखमींना बाहेर काढले आणि जवळच्या रुग्णालयात दाखवले.
दरम्यान, पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन मदत कार्य सुरू केले असून महामार्गावरील वाहतूक काही वेळासाठी विस्कळीत झाली आहे. अपघाताचे कारण अद्याप स्पष्ट झाले नसले तरी चालकाचा ताबा सुटणे अथवा चालकाला झोपेची डुलकी लागल्याने अपघात झाला असू शकतो, अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे.
advertisement
या भीषण अपघाताच्या घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. अपघातग्रस्त वाहन हटवण्यासाठी काही वेळ लागण्याची शक्यता आहे. या अपघातामुळे महामार्गावरील वाहतूक विस्कळीत झाली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon Accident : अपघातात बसचा चुराडा, दोन ठार 15 जखमी, मुक्ताईनगरजवळ महामार्गावर भीषण अपघात
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; बंपर लॉटरी देणारी  सिक्रिट लिस्ट आली समोर, गुंतवणूकदारांनो, पैसे तयार ठेवा
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; गुंतवणूकदारांनो, पैसे तयार ठेवा
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement