मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मित्रांबरोबर निघाला, वाटेतच काळाचा घाला, भीषण अपघातात जागेवर गेला
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
Jalgaon Accident: नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याच्या पुलावर अपघाताची घटना घडली. मृत तरुणाचे नाव हर्षल राजू पाटील असे आहे.
नितीन नांदुरकर, जळगाव: जळगावच्या शिरसाळा येथील प्रसिद्ध मारुती मंदिराचे दर्शन घेण्यासाठी मित्रांसह निघालेल्या दुचाकीस्वार तरुणाचा भीषण अपघातात मृत्यू झाला. या अपघातात त्याचा मित्रही गंभीर जखमी झाला आहे.
ही घटना नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलावर घडली. मृत तरुणाचे नाव हर्षल राजू पाटील असे आहे. तर गंभीर जखमी झालेल्या मित्राचे नाव कुणाल गोकुळ पाटील असे आहे.
हर्षल पाटील हा वराड येथे आई-वडील आणि बहिणीसोबत राहत होता. आज पहाटे तो गावातील ८ ते १० मित्रांसोबत बोदवड तालुक्यातील शिरसाळा येथील मारुतीच्या दर्शनासाठी दुचाकीने निघाला होता.नशिराबाद गावाजवळील टोलनाक्याजवळील पुलावरून जात असताना त्यांच्या दुचाकीला भरधाव वेगात येणाऱ्या डंपरने जोरदार धडक दिली. या अपघातात हर्षलचा जागीच मृत्यू झाला, तर मागे बसलेला कुणाल पाटील गंभीर जखमी झाला आहे.
advertisement
हर्षलला तातडीने खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे. हर्षल हा पाटील कुटुंबातील एकुलता एक मुलगा असल्याने घटनेनंतर घरात शोककळा पसरली आहे. याप्रकरणी नशिराबाद पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून नशिराबाद पोलीस पुढील तपास करत आहेत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
July 19, 2025 3:14 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मारुतीचे दर्शन घेण्यासाठी मित्रांबरोबर निघाला, वाटेतच काळाचा घाला, भीषण अपघातात जागेवर गेला


