Municipal Election : 3 वाजले आणि गेम पलटला, जळगावमध्ये महायुती बहुमतापासून फक्त 'इतक्या' जागा दूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखीण दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.प्रभाग क्रमांक 9 ब मधून विक्रम सोनवणे तर प्रभाग क्रमांक 9 अ मधून रेखा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासोबत प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपच्या वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांचा आकडा आता 11 वर पोहोचला आहे.
Jalgaun Municipal Elecion 2026 : विजय वाघमारे, प्रतिनिधी, जळगाव : जळगाव महापालिका निवडणुकीत अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक घडामोडी घडल्या आहेत. खरं तर अर्ज माघारी घेण्याच्या शेवटच्या दिवशी अनेक उमेदवारांनी माघार घेतल्याने आज पुन्हा एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे आणखीण दोन उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत.प्रभाग क्रमांक 9 ब मधून विक्रम सोनवणे तर प्रभाग क्रमांक 9 अ मधून रेखा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. यासोबत प्रभाग क्रमांक 13 मधून भाजपच्या वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे महायुतीच्या बिनविरोध उमेदवारांचा आकडा आता 12 वर पोहोचला आहे. त्यामुळे निवडणुकीआधीच जळगाव महापालिकेत महायुतीने गेम पालटला आहे. आता
जळगाव महापालिकेच्या निवडणुकीत शिवसेना (शिंदे गट) ला आणखी दोन बिनविरोध जागा मिळाल्या आहेत. प्रभाग क्रमांक 9 ब मधून विक्रम सोनवणे तर प्रभाग क्रमांक 9 अ मधून रेखा पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. शरद पवार यांच्या राष्ट्रवादीच्या उमेदवाराने आणि एका अपक्ष उमेदवाराने माघार घेतल्यामुळे एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेचे हे दोन उमेदवार बिनविरोध ठरले आहे.त्यामुळे आतापर्यंत एकनाथ शिंदे यांच्या एकूण सहा जागा बिनविरोध निवडून आल्या आहेत.या यशानंतर शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी महापालिकेच्या बाहेर जोरदार जल्लोष साजरा केला.
advertisement
एकनाथ शिंदेंसोबत आज जळगाव महापालिका निवडणुकीत भाजपाला आणखी एक बिनविरोध जागा मिळाली आहे. प्रभाग क्रमांक 13 मधून वैशाली अमित पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. त्यामुळे भाजपाचे आतापर्यंत एकूण सहा उमेदवार बिनविरोध निवडून आले आहेत. या यशानंतर महापालिकेच्या बाहेर भाजप कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत जोरदार जल्लोष साजरा केला आहे.
दरम्यान वेळ संपल्यामुळे काही उमेदवारांना माघार घेता आली नाही, मात्र उद्या साधारण वीस उमेदवार महायुतीला समर्थन देतील, अशी माहिती भाजपाचे निवडणूक प्रभारी आमदार मंगेश चव्हाण यांनी दिली. जळगावकरांनी महायुतीला स्पष्ट कौल दिला असून 75 पैकी किमान 70 जागांवर महायुतीचा भगवा फडकेल, असा विश्वासही आमदार मंगेश चव्हाण यांनी व्यक्त केला आहे.
advertisement
दरम्यान आता जळगाव महापालिकेत आता 19 वॉर्डमधून 75 जागांवर निवडणूक पार पडते आहे.या निवडणुकीत भाजप 46 तर एकनाथ शिंदे यांची शिवसेना 25 तर अजित पवार यांची राष्ट्रवादी चार जागा लढते आहे. तर या निवडणुकीत बहुमताचा आकडा 38 आहे. सध्या निवडणुकीआधीच महायुतीने 12 जागा निवडुन आणल्या आहेत.त्यामुळे आता महायुतीला बहुमतासाठी फक्त 26 जागा जिंकायच्या आहेत.या जागा महायुती सहज जिंकेल असा अंदाज आहे.
advertisement
जळगावमधील बिनविरोध उमेदवार
भाजप
उज्वला बेंडाळे (प्रभाग क्र. 12 ब
विशाल भोळे (प्रभाग क्र.7 क )
विरेंद्र खडके (प्रभाग क्र.16 अ)
दीपमाला काळे (प्रभाग क्र.7 अ)
वैशाली पाटील (प्रभाग क्र.13 क)
अंकिता पाटील (प्रभाग क्र.7 ब )
शिवसेना (शिंदे गट)
गौरव सोनवणे (प्रभाग क्र. 18 अ)
मनोज चौधरी (प्रभाग क्र.9 अ)
प्रतिभा देशमुख (प्रभाग क्र.9 ब)
advertisement
सागर सोनवणे (प्रभाग क्र.2 अ)
विक्रम सोनवणे (प्रभाग क्र. 19 ब)
रेखा पाटील (प्रभाग क्र. 19 अ)
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Jan 02, 2026 4:44 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Municipal Election : 3 वाजले आणि गेम पलटला, जळगावमध्ये महायुती बहुमतापासून फक्त 'इतक्या' जागा दूर, कार्यकर्त्यांचा जल्लोष







