Jalgaon News : दागिने चोरताना रंगेहात पकडलं, नागरिकांनी मिळून महिलेला दिला चोप

Last Updated:

जळगावमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका महिलेला दागिने चोरताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरीकांनी महिलेला पकडून चोप दिल्याची घटना घडली आहे.

Jalgaon News
Jalgaon News
Jalgaon News : नितीन नांदुरकर, जळगाव : जळगावमधून एक हादरवून टाकणारी घटना समोर आली आहे.या घटनेत एका महिलेला दागिने चोरताना रंगेहाथ पकडल्याची घटना घडली आहे. या घटनेनंतर संतप्त नागरीकांनी महिलेला पकडून चोप दिल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे.
जळगावच्या अमळनेर शहराच्या मध्यवर्ती बसस्थानकावर ही घटना घडली आहे. या घटनेत सर्व प्रवाशी बसची वाट बघत असताना एक महिला शिताफीने दागिने चोरण्याचा प्रयत्न करत होती. या संदर्भात प्रवाशांना कळताच नागरीकांनी पकडून तिला चोप दिल्याची घटना घडली आहे.या घटनेचा व्हिडिओ देखील व्हायरल झाला आहे. या व्हिडिओत महिला मिळून त्या महिलेला मारहाण करताना दिसत आहे.
advertisement
त्याचं झालं असं की, बसस्थानक परिसरात प्रवाशांच्या गर्दीत एक महिला दुसऱ्या महिलेकडे जाऊन गुपचूप तिच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न करत होती. चोरीचा संशय आल्याने पीडित महिलेने तत्काळ आरडाओरडा केला.यावेळी जवळच उपस्थित असलेल्या इतर महिलांनी व नागरिकांनी तत्परतेने त्या संशयित महिलेला पकडले.
दरम्यान या प्रकरणात संशयित चोर महिलेला नागरीकांनी पोलिसांच्या हवाली केले आहे की नाही,याची माहिती मिळू शकली नाही आहे. पण या घडलेल्या प्रकारामुळे बसस्थानकावर मोठा गोंधळ उडाला होता.
advertisement

जळगावमध्ये चीड आणणारी घटना

जळगाव जिल्ह्यातून एक चीड आणणारी घटना घडली आहे.या घटनेत एका वृद्धाची थेट चिखल तुडवत अंतयात्रा काढावी लागल्याची संतापजनक घटना घडली आहे. स्थानिक प्रशासनाच्या निष्काळजीपणामुळे ही घटना घडली आहे.त्यामुळे नागरीकांकडून संताप व्यक्त होत आहे. तसेच किमान अंत्यविधी करण्यासाठी तरी स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता तयार करून मिळावा अशी मागणी नागरिकांमधून जोर धरते आहे.
advertisement
जळगाव जिल्ह्यातील यावल तालुक्यातील पिळोदा खुर्द या गावातील स्मशानभूमी पर्यंतचा रस्ता हा चिखलमय झाला आहे.त्यामुळे गावात कुणाचाही मृ्त्यू झाला तर स्मशानभूमीपर्यंत चिखल तुडवत अंतयात्रा न्यावी लागते. नुकताच एका वृद्धाचा मृत्यू झाल्यानंतर अशाप्रकारे नागरीकांना अंतयात्रा न्यावी लागली होती. त्यामुळे अंतयात्रेसाठी आलेल्या नागरिकांमधून प्रचंड संताप व्यक्त होतोय.
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jalgaon News : दागिने चोरताना रंगेहात पकडलं, नागरिकांनी मिळून महिलेला दिला चोप
Next Article
advertisement
Blockbuster Movie: पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स; सिनेमा ठरला ब्लॉकबस्टर
पत्नीने खर्च केले 300 कोटी, हिरो पतीचा 19 वर्षांनी लहान अभिनेत्रीसोबत रोमान्स
    View All
    advertisement