जळगावमध्ये लव जिहादाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, भर रस्त्यात दुचाकी पेटवली
- Published by:Prachi Amale
Last Updated:
पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
विजय वाघमारे, प्रतिनिधी
जळगाव : शहरातील मोहाडी रोड परिसरात लव जिहादाच्या संशयावरून एका तरुणाला बेदम मारहाण करून त्याची दुचाकी पेटवून देण्यात आल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या प्रकरणामुळे परिसरात काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले होते. जखमी तरुणावर सध्या स्थानिक रुग्णालयात उपचार सुरू आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, भुसावळ तालुक्यातील एक तरुण आपल्या मैत्रिणीसोबत शनिवारी सायंकाळी मोहाडी रोडवरील एका दुकानाजवळ थांबला होता. त्याचवेळी काही तरुण त्या ठिकाणी आले आणि दोघांची विचारपूस करू लागले. दोघांची चौकशी करताना त्यांनी लव जिहादचा संशय व्यक्त करत तरुणाशी वाद घातला. वाद वाढताच टोळक्याने त्या तरुणाला मारहाण करण्यास सुरुवात केली. काहीजणांनी लाथाबुक्क्यांनी व लाकडी दांडक्यांनी बेदम मारहाण केली. एवढच नाही तर संतापलेल्या आरोपींनी त्या तरुणाची दुचाकी पेटवून दिली.
advertisement
एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल
घटनेनंतर नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी तात्काळ घटनास्थळी धाव घेत परिस्थिती नियंत्रणात आणली आणि जखमी तरुणाला रुग्णालयात हलवले. या संदर्भात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिसांनी प्राथमिक चौकशीनंतर तीन संशयितांना ताब्यात घेतले असून, इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचे सांगण्यात आले आहे.
परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढवला
advertisement
या घटनेमुळे शहरात खळबळ उडाली असून, सोशल मीडियावरही या प्रकरणाची जोरदार चर्चा सुरू आहे. पोलिसांनी अफवा न पसरवण्या नागरिकांना आवाहन केले आहे. घटनेचे गांभीर्य लक्षात घेता परिसरात पोलिसांचा बंदोबस्त वाढविण्यात आला आहे.
आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद
दरम्यान, या घटनेचा व्हिडिओ काही लोकांनी मोबाईलमध्ये रेकॉर्ड केल्याची माहितीही पुढे आली असून, पोलिसांकडून त्याची तपासणी सुरू आहे. आरोपींवर गंभीर गुन्ह्यांची नोंद करण्यात आली असून, तपास अधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे की कोणत्याही धार्मिक किंवा सांप्रदायिक पार्श्वभूमीवर आधारित गुन्हे सहन केले जाणार नाहीत.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
October 11, 2025 10:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
जळगावमध्ये लव जिहादाच्या संशयावरून तरुणाला बेदम मारहाण, भर रस्त्यात दुचाकी पेटवली