गळ्यात निळा मफलर अन् कुंडी उचलून फेकायला गेला आणि पडला, जळगावातील गुंडगिरीचा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
दारु पिऊन वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लोक दारु पिऊन मारहाण, भांडण करत असतात. अशीच आणखी एक धक्कादायक घटना जळगावमधून समोर आली आहे.
नितीन नांदुरकर, जळगाव : दारु पिऊन वाद झाल्याच्या अनेक घटना समोर आल्या आहेत. लोक दारु पिऊन मारहाण, भांडण करत असतात. अशीच आणखी एक धक्कादायक घटना जळगावमधून समोर आली आहे. जळगावात दोन दुचाकीस्वारांमध्ये झालेल्या वादातून बेधुंदपणे लाकडी दांडक्याने 17 ते 18 जणांना मारहाण करत तोडफोड केली. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओही समोर आला असून या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरात सायंकाळच्या सुमारास हॉटेलच्या बाहेर उभे असलेल्या दोन जणांमध्ये मद्यपी दूचाकी स्वारांमध्ये झालेल्या वादातून दोन्ही गटाच्या तरुणांकडून या परिसरात उभे असलेल्या नागरिकांना बेधुंदपणे लाकडाच्या डांक्याने मारहाण करण्यात आली. हॉटेलच्या बाहेर ठेवलेल्या झाडाच्या कुंड्या फोडून तोडफोड करण्यात आली.
या ठिकाणी दोन तरुणांमध्ये वाद झाला या वादाचे रूपांतर हाणामारीत झाल्यानंतर दोन्ही तरुणांनी आपापल्याकडच्या तरुणांना बोलावलं. संबंधित दोही गटाच्या टवाळखुरांनी या परिसरातील हॉटेल नैवेद्य बाहेर तोडफोड करत सतरा ते अठरा नागरिकांना बेधुंदपणे मारहाण केली.
advertisement
गळ्यात निळी मफलर अन् कुंडी उचलून फेकायला गेला आणि पडला, जळगावतला गुंडगिरीचा VIDEO#jalgoan #shocking #news18marathi pic.twitter.com/hx5kmaN9dx
— News18Lokmat (@News18lokmat) February 7, 2024
टवाळखोरांनी केलेल्या मारहाणीत हॉटेल मालकासह चार ते पाच जण जखमी झाले आहेत. या ठिकाणी भीतीने नागरिकांची पळापळ झाली.
advertisement
घटनेची माहिती मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळ गाठले तसेच या ठिकाणी जमलेली गर्दी पांगवली. जखमींना रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे.
या घटनेचा तरुणांचा मारहाणीचा सीसीटीव्ही फुटेज आला समोर आला असून याप्रकरणी पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिकचा तपास सुरु आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Feb 07, 2024 8:58 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
गळ्यात निळा मफलर अन् कुंडी उचलून फेकायला गेला आणि पडला, जळगावातील गुंडगिरीचा VIDEO








