Plane crash: विमानतळावर अपघात, धावपट्टीवरुन विमान घसरलं; जळगावमधील घटनेचा VIDEO
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. जळगाव विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमान लँड करताना धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. विमान घसरून धावपट्टीवरुन बाजूला पडलं.
नितीन नांदूरकर, जळगाव: विमानतळावर एक धक्कादायक घटना घडली. जळगाव विमानतळावर प्रशिक्षणार्थी विमान लँड करताना धावपट्टीवरून घसरल्याची घटना घडली. विमान घसरून धावपट्टीवरुन बाजूला पडलं. या अपघातानं एकच खळबळ उडाली.
जळगाव विमानतळावर घडलेल्या या दुर्घटनेत सुदैवानं कोणालाही मोठी दुखापत झाली नाही. प्रशिक्षणार्थी विमानातील पायलट अथवा कुणालाही दुखापत झालेले नाही. जिल्हाधिकारी आयुष प्रसाद यांच्याकडून घटनेला दुजोरा मिळाला आहे.
विमान धावपट्टीवर घसल्यामुळे या घटनेत प्रशिक्षणार्थ विमानाचे थोड्या प्रमाणात नुकसान झाल्याची माहिती आहे. जळगाव जिल्हा प्रशासनाच्या वतीने भारतीय विमान प्राधिकरणला ही घटना कळविण्यात आली आहे.
advertisement
विमानतळावर अपघात, धावपट्टीवरुन विमान घसरलं; जळगावमधील घटनेचा VIDEO#jalgoan #news18marathi #planaccident pic.twitter.com/Ud1TW0CDCX
— News18Lokmat (@News18lokmat) June 19, 2024
दरम्यान, जळगाव विमानतळावरून विद्यार्थ्यांना पायलटचे प्रशिक्षण दिले जाताना हा अपघात घडला. असच एक प्रशिक्षणार्थी विमान हे लँड होत असताना ते थोडं घसरल्याची जिल्हाधिकाऱ्यांची माहिती.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 19, 2024 8:18 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Plane crash: विमानतळावर अपघात, धावपट्टीवरुन विमान घसरलं; जळगावमधील घटनेचा VIDEO










