advertisement

मोठी बातमी! धावत्या एसटीचा रॉड तुटला; चालकाच्या सतर्कतेमुळे 50 प्रवासी थोडक्यात वाचले

Last Updated:

जळगाववरून निघालेल्या बसचा रॉड अचानक तुटल्यानं मोठ्या अपघाताची शक्यता निर्माण झाली होती. मात्र चालकाच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे.

News18
News18
जळगाव, 14 ऑगस्ट, नितीन नांदूरकर : जळगाव बसस्थानकातून पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावी जात असलेल्या जळगाव - बांबरुड बसचा रॉड तुटल्याने अपघात झाल्याची घटना जळगाव तालुक्यातील शिरसोली गावाजवळ घडली आहे. बसमध्ये एकूण 50 प्रवासी होते, रॉड तुटल्यानं चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले. मात्र चालकाने सतर्कता दाखवत बस रस्त्याच्या एका बाजुला सुरक्षितपणे उभी केली, त्यामुळे मोठा अनर्थ टळला आहे. हेमंत पाटील असं या बसचालकाचं नाव आहे. हेमंत पाटील हे आमच्यासाठी देवदूत ठरल्याची प्रतिक्रिया या अपघातातून वाचलेल्या प्रवाशांनी व्यक्त केली आहे.
मोठा अपघात टळला
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, जळगावहून पाचोरा तालुक्यातील बांबरुड गावाला जाण्यासाठी सायंकाळच्या सुमारास जळगाव बसस्थानकातून जळगाव डेपोची बस निघाली होती . या बसने जळगाव सोडल्यानंतर शिरसोली गावाजवळ बसच्या पुढील चाकाजवळचा रॉड तुटला, त्यामुळे चालकाचे स्टेरींगवरील नियंत्रण सुटले. मात्र समयसूचकता दाखवत चालक हेमंत पाटील यांनी पुन्हा बसवर नियंत्रण मिळवत बस रस्त्याच्या कडेला उभी केली. पाटील यांच्या सतर्कतेमुळे मोठा अपघात टळला आहे.
advertisement
प्रवाशांचा संताप
या प्रसंगानंतर प्रवाशांनी चालक हेमंत पाटील यांचा सत्कार केला. टाळ्या वाजवून आणि त्यांना श्रीफळ देऊन त्यांचं कौतुक करण्यात आलं. दरम्यान या घटनेनंतर एसटी महामंडळाकडून प्रवाशांसाठी दुसऱ्या बसची व्यवस्था करण्यात आली. मात्र काही अतंर गेल्यानंतर ती देखील बंद पडली त्यामुळे प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. दुसरी बस मागितल्याचा रागातून एसटीच्या एका वरिष्ठ अधिकाऱ्यानं चालकासह प्रवाशांना शिवीगाळ केली असा आरोपही या प्रवाशांकडून करण्यात आला आहे. संबंधित अधिकाऱ्याविरोधात कारवाई करण्यात यावी अशी मागणी प्रवाशांनी केली आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
मोठी बातमी! धावत्या एसटीचा रॉड तुटला; चालकाच्या सतर्कतेमुळे 50 प्रवासी थोडक्यात वाचले
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement