Accident News : जळगावात कंटेनरची बोलेरोला भीषण धडक, तीन तरुणांचा जागीच मृत्यू
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
जामनेर-टाकळी रस्त्यावर काल सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरचे असल्याची माहिती मिळते.
इम्तियाज अहमद, जामनेर, 19 डिसेंबर : जामनेर-टाकळी रस्त्यावर नागदेवता मंदिराजवळ भीषण अपघात झाला. या अपघातात बोलेरो जीपमधील तिघांचा जागीच मृत्यू झाला. जामनेरकडून पहूरच्या दिशेने जाणाऱ्या कंटनेर आणि बोलेरोची समोरासमोर भीषण धडक झाली. अपघातात गाडीच्या पुढच्या भागाचा चक्काचूर झाला होता.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, जामनेर-टाकळी रस्त्यावर काल सायंकाळी हा भीषण अपघात झाला. अपघातात मृत्यूमुखी पडलेले तिघेही छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातल्या गंगापूरचे असल्याची माहिती मिळते. जामनेरकडून पहूरला निघाललेला कंटेनर आणि बोलेरो जीपची भीषण धडक झाली. या अपघातात शेख समीर शेख नजीर, अल्लाउद्दीन शेख, साजन बडोले यांचा मृत्यू झाला आहे. बोलेरोतून तिघेही मध्य प्रदेशातील बऱ्हाणपूर-खंडव्याकडे निघाले होते.
advertisement
Accident News : पैठणमध्ये घरी येताना मायलेकासोबत दुर्दैवी घटना, मुलाचा जागीच मृत्यू तर आई गंभीर जखमी
अपघातानंतर स्थानिकांनी घटनास्थळी धाव घेत जखमींना रुग्णालयात दाखल केले. पोलिसांच्या मदतीने दोन मृतदेह बाहेर काढण्यात आले. तर तिसऱ्याला रुग्णालयात दाखल केले. पण उपचारापूर्वीच त्याचा मृत्यू झाला होता. या अपघाताची नोंद पोलिसात झाली आहे. अपघातानंतर कंटेनर चालक घटनास्थळावरून फरार झाला असून त्याचा शोध घेतला जात आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Dec 19, 2023 8:03 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Accident News : जळगावात कंटेनरची बोलेरोला भीषण धडक, तीन तरुणांचा जागीच मृत्यू









