मोठी बातमी! निकालापूर्वीच उद्धव ठाकरे, शरद पवारांना मोठा धक्का; 200 प्रमुख पदाधिकारी सोडणार साथ, अजित पवार गटात प्रवेश
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार आहे. मात्र निकालापूर्वीच उद्धव ठाकरे आणि राष्ट्रवादी शरद पवार गटाला मोठा धक्का बसला आहे.
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनीधी : आज शिवसेनेच्या आमदार अपात्रता प्रकरणाचा निकाल लागणार आहे. विधानसभा अध्यक्ष राहुल नार्वेकर हे या प्रकरणात निकाल देणार आहेत. मात्र या निकालापूर्वीच शिवसेना उद्धव ठाकरे गट, राष्ट्रववादी काँग्रेस शरद पवार गट आणि काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे. रावेर लोकसभा मतदारसंघातील तब्बल 200 प्रमुख पदाधिकारी आज सायंकाळी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. हे पदाधिकारी गाड्यांच्या ताफ्यासह जळगावहून मुंबईकडे रवाना झाले आहेत. शरद पवार गटाचे पदाधिकारीही अजित पवार गटात प्रवेश करणार असल्यानं हा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे.
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मुंबईतील देवगिरी बंगल्यावर हा पक्षप्रवेश सोहळा होणार आहे. महाविकास आघाडीचे दोनशेहून अधिक पदाधिकारी अजित पवार गटात प्रवेश करणार आहेत. या पदाधिकाऱ्यांमध्ये जिल्हा परिषद सदस्य, सभापती, नगराध्यक्ष, नगरसेवक, सरपंच यांचा समावेश आहे. 15 गाड्यांचा ताफा जळगाहून मुंबईकडे रवाना झाला आहे.
देवगिरी बंगल्यावर सायंकाळी सहा वाजता अजित पवार यांच्या हस्ते सर्व कार्यकर्ते पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटात प्रवेश होणार आहे. रावेर मतदार संघ हा एकनाथ खडसे यांचा बालेकिल्ला आहे, त्यामुळे तब्बल दोनशे पदाधिकाऱ्यांचा राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटातील हा प्रवेश सोहळा एकनाथ खडसे यांच्यासाठी मोठा धक्का मानला जात आहे. उद्धव ठाकरे गट आणि काँग्रेसला देखील या लोकसभा मतदारसंघात मोठा धक्का बसला आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
January 10, 2024 10:21 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
मोठी बातमी! निकालापूर्वीच उद्धव ठाकरे, शरद पवारांना मोठा धक्का; 200 प्रमुख पदाधिकारी सोडणार साथ, अजित पवार गटात प्रवेश


