Bhusaval News : भुसावळात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर पडलं रॉकेट, आग लागल्याने प्रशासनाची तारांबळ
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Bhusaval News : भुसावळमध्ये ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर रॉकेट पडल्याने आग लागल्याची घटना घडली आहे.
जळगाव, 13 नोव्हेंबर (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : सध्या देशभर दिवाळी सुरू असून लोकांचा मोठ्या प्रमाणात उत्साह दिसून येत आहे. दरम्यान, फटकांमुळे काही ठिकाणी आग लागल्याच्या घटनाही समोर आल्या आहेत. जिल्ह्यातील भुसावळात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर रॉकेट पडल्याने आग लागल्याची घटना घडली. सुदैवाने यात कोणतीही जीवितहानी झाली नाही.
काय आहे घटना?
भुसावळ तहसील कार्यालयातील गोदामात निवडणुकीसाठीचे ईव्हीएम मशीन ठेवलेल्या गोदामाच्या छतावर फटाक्यांचे रॉकेट पडल्यामुळे गोदामावरील टाकलेल प्लास्टिकचा कागद पेटल्याचा प्रकार घडला. अग्निशमन दलाला पाचारण करण्यात आल्यानंतर तातडीने आग विझवण्यात आली. जळगाव जिल्हाधिकारी आयुष प्रसाद व जिल्हा पोलीस अधीक्षक एम. राजकुमार यांनी भेट देत पाहणी केली.
वाचा - खेकड्यांच्या शिकारीसाठी गेले अन् स्वतःच शिकार झाले; सख्ख्या भावांचा मृत्यू
भुसावळ तहसील कार्यालयाच्या आवारामध्ये असलेल्या गोदामात निवडणुकीसाठी लागणारे ईव्हीएम मशीन ठेवण्यात आले आहे. पाऊस गोदामात पडू नये म्हणून गोदामाच्या छतावर पत्रांवर प्लास्टिकचा कागद टाकण्यात आला आहे. मात्र, दिवाळी सणात कुणीतरी रॉकेट उडवल्यानंतर त्याची ठिणगी गोदामाच्या छतावर पडली व त्यामुळे आग लागली. पालिकेच्या अग्निशामन दलाला कळवताच काही वेळात बंबने ही आग विझवली.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Nov 13, 2023 7:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Bhusaval News : भुसावळात ईव्हीएम ठेवलेल्या गोदामाच्या छतावर पडलं रॉकेट, आग लागल्याने प्रशासनाची तारांबळ









