Ajit Pawar : विधानसभेच्या तोंडावर पवारांचा अजितदादांना पुन्हा धक्का! या जिल्ह्यात पाडलं खिंडार
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Ajit Pawar : विधानसभेआधी अजित पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेसला मोठा धक्का बसला आहे.
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : विधानसभा निवडणुका तोंडावर आल्या असून सर्वच राजकीय पक्ष आता ताकदीने मैदानात उतरले आहेत. लोकसभा निवडणुकीत मिळालेल्या घवघवित यशानंतर महाविकास आघाडी फॉर्मात दिसत आहे. यातही शरद पवार गटाचा स्ट्राईक रेट हा राज्यात सर्वाधिक होता. याचाच परिणाम म्हणजे आता हळहळू नेत्यांची पवार गटात घरवापसी होऊ लागली आहे. राष्ट्रवादी अजित पवार गटाच्या युवक कार्यकारिणीतील युवक विधानसभा क्षेत्र प्रमुखांसह तब्बल 20 जणांनी आज राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार गटात प्रवेश केला.
अजितदादांना धक्का
जळगावच्या महिला मेळाव्यात खासदार सुप्रिया सुळे यांच्या हस्ते अजित पवार गटातील युवक कार्यकारिणीतील 20 जणांनी शरद पवार गटात प्रवेश केला. मंत्री अनिल पाटील वेळ देत नसल्याने तसेच कार्यकर्त्यांची कुठलीही कामे नसल्याने नाराजी होती. त्यामुळे शरद पवार गटात प्रवेश केल्याचे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले. अजित पवार गटाचे युवक कार्याध्यक्ष साहील पटेल, युवक शहर जिल्हाध्यक्ष सुशील शिंदे, विधानसभा क्षेत्र प्रमुख युवक रफिक पटेल, युवक उपाध्यक्ष अमर येवले यांच्यासह 20 जणांनी अजितदादांना सोडचिठ्ठी देत शरद पवार गटात जाहीर प्रवेश केला.
advertisement
वाचा - वादग्रस्त रामगिरी महाराज-मुख्यमंत्र्यांच्या भेटीवर जितेंद्र आव्हाड संतापले
अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यानंतर युवक पदाधिकाऱ्यांनी शरद पवार यांना सोडून अजित पवार गटात प्रवेश केला होता. अजित पवार गटात गेलेले सर्व युवक पदाधिकारी 9 महिन्यानंतर पुन्हा शरद पवार गटात परतले आहेत. एक निष्ठावंत राहून सुद्धा कुठल्याही पदाधिकारी व कार्यकत्याच्या समस्या आपल्या पक्षाचे मंत्रीअनिल भाईदास पाटील यांनी सोडविल्या नाही. याच कारणामुळे अजित पवार गटातील पदाचा राजीनामा देऊन शरद पवार गटात प्रवेश केला असल्याचे युवक पदाधिकाऱ्यांनी सांगितले.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Aug 17, 2024 4:30 PM IST
मराठी बातम्या/जळगाव/
Ajit Pawar : विधानसभेच्या तोंडावर पवारांचा अजितदादांना पुन्हा धक्का! या जिल्ह्यात पाडलं खिंडार










