advertisement

जळगावात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, पोलिसांनी हल्लेखोरांचा उतरवला माज, धिंड काढून कोर्टात...

Last Updated:

जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी चाळीसगाव: जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव शहरात माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर झालेल्या प्राणघातक हल्ल्याप्रकरणी पोलिसांनी तीन आरोपींना अटक केली आहे. पोलिसांनी तिन्ही आरोपींची शहरातून धिंड काढली. या घटनेमुळे शहरात चर्चेला उधाण आले आहे.
२६ ऑगस्ट रोजी माजी नगरसेवक प्रभाकर चौधरी यांच्यावर कोयत्याने हल्ला करण्यात आला होता. या हल्ल्यानंतर आरोपी फरार झाले होते. चाळीसगाव शहर पोलिसांनी या प्रकरणाचा तपास करत मुख्य आरोपी सोमा उर्फ सागर चौधरी, हरीश उर्फ सनी पाटील आणि गौरव उर्फ सोनू चौधरी यांना शहरातूनच सापळा रचून अटक केली.
आरोपींनी शहरात दहशत निर्माण केल्यामुळे त्यांची दहशत कमी करण्यासाठी पोलिसांनी एक वेगळा मार्ग अवलंबला. पोलिसांनी तिन्ही आरोपींना पायी चालवत, त्यांची शहरातून धिंड काढली आणि नंतर त्यांना न्यायालयात हजर केले. पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे नागरिकांनी कौतुक केले आहे. या घटनेमुळे आरोपींना चांगलीच अद्दल घडली असल्याचे म्हटले जात आहे.
advertisement
दरम्यान, न्यायालयाने तिन्ही आरोपींना सात दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. पोलीस अधीक्षक डॉ. महेश्वर रेड्डी, अपर पोलीस अधीक्षिका कविता नेरकर आणि विभागीय पोलीस अधिकारी विजय ठाकूरवार यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक अमितकुमार मनेल या प्रकरणाचा पुढील तपास करत आहेत.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावात माजी नगरसेवकावर जीवघेणा हल्ला, पोलिसांनी हल्लेखोरांचा उतरवला माज, धिंड काढून कोर्टात...
Next Article
advertisement
Eknath Shinde: महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? एकनाथ शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेट बैठकीला दांडी, नेमकं कारण आलं समोर
महापालिका निकालानंतर महायुतीत बिनसलं? शिंदेंची सलग दुसऱ्या कॅबिनेटला दांडी,
  • राज्याच्या राजकीय वर्तुळात महापालिका निवडणुकीनंतर मोठ्या घडामोडी सुरू आहेत.

  • आज होणाऱ्या राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे गैरहजर राहणा

  • मागील बैठकीतही एकनाथ शिंदे हे अनुपस्थित होते.

View All
advertisement