Jalgaon News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधीच जळगावात वातावरण तापलं, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र दौऱ्यापूर्वीच वातावरण तापलं आहे.
जळगाव, 12 सप्टेंबर, नितीन नांदूरकर : आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी कार्यक्रमासाठी जळगाव जिल्ह्याच्या दौऱ्यावर आहेत. मात्र या दौऱ्यापूर्वीच जिल्ह्यात वातावरण तापलं आहे. मराठा आरक्षणासह विविध मागण्यांसाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना निवेदन देऊन आंदोलन करण्याच्या तयारीत असलेल्या मराठा समाजाच्या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या ताफ्यासमोर आंदोलन करण्यात येणार होतं, मात्र आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.
मुख्यमंत्री शिंदे जळगावच्या दौऱ्यावर
आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे शासन आपल्या दारी कार्यक्रमानिमित्त जळगावच्या दौऱ्यावर आहेत. त्यांच्यासोबत उपमुख्यमंत्री अजित पवार देखील आहेत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांचं जळगाव विमानतळावर आगमन होताच कार्यकर्त्यांकडून भव्य स्वागत करण्यात आलं आहे.
राज्यभरात आंदोलन
दरम्यान राज्यात सध्या मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा समाजाला आरक्षण मिळावे यासाठी मनोज जरांगे पाटील हे जालना जिल्ह्यातील अंतरवाली साराटी येथे उपोषणाला बसले आहेत. त्यांच्या उपोषणाचा आज 15 वा दिवस आहे. त्यांच्या आंदोलनाला राज्यभरातून पाठिंबा मिळत असून, अनेक जिल्ह्यांमध्ये मराठा समाजाच्या वतीनं आंदोलन सुरू आहे.
advertisement
मराठा समाजाला कुणबी प्रमाणपत्र मिळावे अशी मागणी जरांगे यांनी केली आहे. मात्र दुसरीकडे कुणबी समाजाकडून मराठा सामाजाला प्रमाणपत्र देण्यास विरोध होत आहे. कुणबी समाजाकडून देखील आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे. मराठा समाजाला ओबीसीमधून आरक्षण देऊ नये अशी भूमिका ओबीसी समाजानं घेतली आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
September 12, 2023 1:38 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : मुख्यमंत्र्यांच्या कार्यक्रमाआधीच जळगावात वातावरण तापलं, आंदोलकांना पोलिसांनी घेतलं ताब्यात


