'ये गूंगे बहरे की सरकार है, कूछ भी नही सुनती..', जळगावातून प्रणिती शिंदेंचा जोरदार हल्लाबोल

Last Updated:

जळगावमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले, या अधिवेशनात भाषण करताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
जळगाव, नितीन नांदूरकर प्रतिनीधी : 'ये गूंगे बहरे की सरकार है, ये कूछ भी नही सुनती' म्हणत काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. त्या जळगावमध्ये आयोजित एका कार्यक्रमामध्ये बोलत होत्या. विधानसभेत बोलूनही काय उपयोग? कारण या ठिकाणी मंत्र्यांना स्वत:च कळत नाही ते मंत्री आहेत म्हणून असा टोलाही यावेळी प्रणिती शिंदे यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाल्या प्रणिती शिंदे? 
जळगावमध्ये सफाई कर्मचाऱ्यांचे राष्ट्रीय अधिवेशन पार पडले, या अधिवेशनात भाषण करताना काँग्रेसच्या आमदार प्रणिती शिंदे यांनी केंद्र व राज्य सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे.  ' हे सरकार गुंगे आणि बहिरे आहे, हे सरकार कुणाचंच काही ऐकत नाही. विधानसभेत पण काय बोलाव कारण या ठिकाणी मंत्र्यांना स्वत:च कळत नाही ते मंत्री आहेत म्हणून, राज्याचा अर्धा कारभार सचिव चालवत आहेत, अशा शब्दात प्रणिती शिंदे यांनी सरकारवर निशाणा साधला आहे.
advertisement
पुढे बोलताना त्या म्हणाल्या की, सरकारला जागं करण्यासाठी गदा-गदा हलवण्याची गरज आहे. तेव्हाच सफाई कामगारांचे प्रश्न सुटतील. डॉ. उल्हास पाटील हेच आगामी लोकसभा निवडणुकीत खासदार होतील, असा विश्वासही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'ये गूंगे बहरे की सरकार है, कूछ भी नही सुनती..', जळगावातून प्रणिती शिंदेंचा जोरदार हल्लाबोल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement