'सरकारचा तुघलकी निर्णय यामुळे...'; नव्या हिट अँड रन कायद्यावरून पटोलेंनी सुनावलं

Last Updated:

केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहनचालक संघटनांकडून विरोध होत आहे. यावरून नाना पटोले यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे.

News18
News18
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : केंद्र सरकारच्या मोटर वाहन कायद्याला देशभरातील वाहनचालक संघटनांकडून विरोध होत आहे. याच पार्श्वभूमीवर संप पुकारण्यात आला आहे. संप पुकारल्यामुळे राज्यभरात पेट्रो-डिझेलचा तुटवडा जाणवू लागला आहे. सोबतच जीवानावश्यक वस्तुंच्या पुरवठ्यावर देखील याचा मोठा परिणाम झाला आहे. यावर आता काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी प्रतिक्रिया दिली आहे. सरकारनं हा तुघलकी निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे संपूर्ण देशातलं जनजीवन विस्तळीत झालं आहे, जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले पटोले? 
सरकारनं हा तुघलकी निर्णय घेतला आहे, या निर्णयामुळे संपूर्ण देशातलं जनजीवन विस्तळीत झालं आहे, जनतेला त्याचे परिणाम भोगावे लागत असल्याचं पटोले यांनी म्हटलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, वाहन चालकांसाठी केलेला हा कायदा काळा कायदा असून त्यामुळेच या कायद्या विरोधात सर्व चालक रस्त्यावर उतरले आहेत. जन जीवन विस्कळीत ठेवण्याचं काम तानाशाही प्रवृत्ती म्हणजेच या केंद्र सरकारच्या माध्यमातून केलं जात आहे, अशी टीका पटोले यांनी केली.
advertisement
राऊतांची प्रतिक्रिया 
दरम्यान या कायद्यावर शिवसेना ठाकरे गटाचे नेते सजंय राऊत यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे. महाराष्ट्रामध्ये फक्त पेट्रोल-डिझेल संपाचाच गोंधळ नाही तर मालवाहतूक ठप्प झाल्यामुळे जीवनावश्यक वस्तूंचा तुटवडा निर्माण झाला आहे. सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या पुरवठ्यावर परिणाम झाला आहे. लोक रस्त्यावर उतरले आहेत. पोलिसांवर हल्ले झाले आहेत. या संदर्भात राज्य सरकारने तातडीने पावलं उचलणं गरजेचं आहे. याबाबत केंद्रातील नेत्यांशी चर्चा करणं आवश्यक आहे. प्रकरण चिघळत गेलं तर त्याचा सामान्य माणसाला त्रास सहन करावा लागेल असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
'सरकारचा तुघलकी निर्णय यामुळे...'; नव्या हिट अँड रन कायद्यावरून पटोलेंनी सुनावलं
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement