advertisement

एकनाथ शिंदे तब्बल 45 मिनिटं ताटकळत, 'तो' तयारच नव्हता; गिरीश महाजनांची मध्यस्थी अन् जळगावात हायव्हॉल्टेज ड्रामा!

Last Updated:

Eknath shinde stucks at jalgoan airport : उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुक्ताईनगरचा दौरा आटपून मुंबईला येत असताना मोठी अडचण आली. एकनाथ शिंदे यांना 45 मिनिटं ताटकळत उभं राहावं लागलं.

Eknath shinde stucks at jalgoan airport
Eknath shinde stucks at jalgoan airport
Jalgoan airport 45 min drama : नेतेमंडळीचा खोळंबा झाला तर मोठी अडचण होते. त्यात एखादा मंत्री असेल तर विषय वेगळा... मात्र, जळगावात अजब प्रकार पहायला मिळाला. जळगावात उपमुख्यमंत्र्यांना 45 मिनिटं ताटकळत उभं रहावं लागलं. मुक्ताईनगर येथील दौरा आटपून मुंबईला परतण्यासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे जळगाव विमानतळावर पोहोचले. मात्र, तिथे त्यांच्यासमोर एक अनपेक्षित अडथळा उभा राहिला. त्यांच्या विमानाचा वैमानिक, ज्याने उड्डाण करण्यास स्पष्ट नकार दिला. हा सर्व प्रकार जळगाव विमानतळावर घडला. या घटनेमुळे शिंदे यांना जवळपास 45 मिनिटे विमानतळावरच ताटकळत राहावे लागले.

वैमानिकाचा विमान उडवण्यास नकार

या नकाराचे कारण स्पष्ट होते. वैमानिक सलग १२ तासांपासून विमान उडवण्याचे काम करत होता. त्याच्या प्रकृतीला आणि तांत्रिक नियमांनुसार अधिक काम करणे शक्य नव्हते. यामुळेच, वैमानिकाने सुरक्षिततेच्या दृष्टीने विमान उडवण्यास नकार दिला.

गिरीश महाजन अन् गुलाबराव पाटलांची मध्यस्थी

या परिस्थितीवर तोडगा काढण्यासाठी, स्वतः उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, मंत्री गिरीश महाजन, आणि मंत्री गुलाबराव पाटील यांनी वैमानिकाशी चर्चा केली. त्यांनी वैमानिकाची समजूत काढण्याचा प्रयत्न केला. अखेर, या चर्चेनंतर वैमानिकाने विमान उडवण्यास होकार दर्शवला. या विलंबामुळे एकनाथ शिंदे यांना मुंबईला जाण्यास तब्बल पाऊण ते एक तास उशीर झाला. पाऊण तासाच्या प्रतीक्षेनंतर अखेर उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे मुंबईकडे रवाना झाले.
advertisement

गिरीश महाजन म्हणाले...

वैमानिकांच्या प्रकृतीसह त्याच्या वेळेचा किरकोळ विषय होता. त्याच्या कंपनीशी बोलणं करून एकनाथ शिंदे यांचे विमान रवाना झालं. पायलटच्या तब्येतीची अडचण होती. त्यातही वेळेची अडचण होती. टेक्निकल अडचण होत्या. त्यांच्या कंपनीशी आम्ही बोललो. त्यावेळी त्यांनी पायलटला त्यांच्या भाषेत समजावलं. किरकोळ अडचण होती, विमानात उडालेलं आहे, असं गिरीश महाजन म्हणाले.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
एकनाथ शिंदे तब्बल 45 मिनिटं ताटकळत, 'तो' तयारच नव्हता; गिरीश महाजनांची मध्यस्थी अन् जळगावात हायव्हॉल्टेज ड्रामा!
Next Article
advertisement
Budget Stocks: बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; बंपर लॉटरी देणारी  सिक्रिट लिस्ट आली समोर, गुंतवणूकदारांनो, पैसे तयार ठेवा
बजेटपूर्वी मोठा ट्विस्ट, शेअर मार्केटमध्ये खळबळ; गुंतवणूकदारांनो, पैसे तयार ठेवा
  • उद्या रविवार पण सुट्टी नाही

  • शेअर्सची सिक्रिट लिस्ट आली समोर

  • उद्यासाठी पैसे आजच तयार ठेवा!

View All
advertisement