Accident News : जळगावात कार, दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 1 जखमी
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जळगावमध्ये कार आणि दुचाकीचा भीषण अपघात झाला, या अपघातामध्ये दोघांचा मृत्यू झाला आहे.
जळगाव, इम्जियाज अहमद, प्रतिनिधी : जिल्ह्यातून भीषण अपघाताची बातमी समोर आली आहे. दुचाकी आणि कारचा अपघात झाला. या अपघातामध्ये एका तरुणासह वृद्धाचा जागीच मृत्यू झाला आहे. रावेरमधील कोचूर-सावदा रस्त्यावर ही दुर्दैवी घटना घडली आहे. या अपघातामध्ये कारचालक थोडक्यात बचावला असून, तो जखमी झाला आहे.
घटनेबाबत अधिक माहिती अशी की, दुचाकी व चारचाकीचा भीषण अपघात झाला. या अपघातामध्ये तरुणासह वृद्धाचा जागीच मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. कोचूर ते सावदा रस्त्यावरील स्मशानभूमी जवळ हा अपघात झाला. धडक एवढी जोरदार होती की कार बाजूच्या नाल्यात जाऊन उलटली. या अपघातामध्ये चिनावल येथील वीरेंद्र सुनील नेमाडे (वय २७) व अनिल चुडामण मेढे (वय ६५, रा. दोघे चिनावल) यांचा जागीच मृत्यू झाला. घटनास्थळी कोचूर व चिनावल येथील ग्रामस्थांची मोठी गर्दी झाली होती. मृत तरुण अविवाहित असून, आई-वडिलांना एकूलता एक आहे. तर दुसरे मृत व्यक्ती हे सुतार काम करतात.
advertisement
कोचूर ते सावदा रस्त्यावर दुचाकी आणि कारची समोरासमोर धडक झाली. या अपघातात कारचालक एअर बॅगमुळे बचावला असून, किरकोळ जखमी झाला आहे. त्याच्यावर खासगी रुग्णालयात उपचार सुरू आहेत. घटनेची माहिती मिळताच सावदा पोलीस घटनास्थळी दाखल झाले. घटनेचा पंचनामा करून त्यांनी मृतदेह शवविच्छेदनासाठी रावेरच्या रुग्णालयात पाठवले आहेत. या प्रकरणात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे. घटनेबाबत अधिक तपास सुरू असल्याची माहिती पोलिसांनी दिली.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
May 01, 2024 8:23 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Accident News : जळगावात कार, दुचाकीचा भीषण अपघात; दोघांचा मृत्यू, 1 जखमी


