पार्किंगच्या वादातून तीन जणांवर जीवघेणा हल्ला, घटना CCTVमध्ये कैद
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करायला अनेकदा जागा शिल्लक नसते. त्यामुळे लोकांमध्ये बऱ्याचदा पार्किंगवरुन भांडणे होताना दिसतात. पार्किंगवरुन झालेल्या वादाच्या घटना समोर येत असतात.
नितीन नांदुरकर, 30 ऑक्टोबर : रस्त्याच्या बाजूला वाहने पार्क करायला अनेकदा जागा शिल्लक नसते. त्यामुळे लोकांमध्ये बऱ्याचदा पार्किंगवरुन भांडणे होताना दिसतात. पार्किंगवरुन झालेल्या वादाच्या घटना समोर येत असतात. अशीच एक घटना सध्या समोर आली आहे. ज्यामध्ये वाहन लावण्यावरून तीन जणांवर प्राणघातक हल्ला करण्यात आला. या घटनेचा सीसीटीव्ही व्हिडीओ समोर आलाय.
वाहन लावण्यावरुन झालेल्या वादाची घटना जळगावमधून समोर आली आहे. जळगाव शहरातील पंचमुखी हनुमान मंदिर परिसरात असलेल्या नीलकमल हॉस्पिटल येथे शस्त्रक्रियेसाठी आलेल्या डॉ. नीरज चौधरी यांच्यासह त्यांच्या दोन सहकाऱ्यांवर नारळ विक्रेत्यानं हल्ला केला. वाहन लावण्याच्या कारणावरून प्राणघातक हल्ला केल्याचा प्रकार घडला.
नारळ विक्रेत्याने थेट कोयत्याने वार केल्याने एक जण जखम झालाय. या ठिकाणी आलेल्या एका महिलेनेदेखील मी पोलिस आहे, असं म्हणत डॉक्टरांना मारहाण केली. या प्रकरणी एमआयडीसी पोलीस ठाण्यात तीन जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
advertisement
पार्किंगच्या वादातून तीन जणांवर जीवघेणा हल्ला, जळगावमधील घटना CCTVमध्ये कैद#jalgoan #news18marathi pic.twitter.com/TaEB6KRHVS
— News18Lokmat (@News18lokmat) October 30, 2023
डॉ. नीरज चौधरी हे सकाळी पांडे चौक परिसरातील नीलकमल हॉस्पिटलमध्ये शस्त्रक्रियेसाठी त्यांचे सहकारी अजय सेनानी, मंगेश दांगोडे यांच्यासह कारने आले होते. ही कार त्यांनी रुग्णालयासमोर उभी केली व ते आतमध्ये जात असताना एक जण तेथे आला व या जागेवर मी नारळाची गाडी लावतो, तुम्ही गाडी काढून घ्या असं सांगितलं. परंतू डॉ. निरज चौधरी हे रूग्णालयात निघून गेले. त्यानंतर नारळ विक्रेते दोन जण यांनी डॉक्टरची कॉलर पकडून मारहाण केली. नाराळ विक्रेत्यांपैकी एकाने कोयता काढून वार करण्याचा प्रयत्न केला. दरम्यान डॉ. निरज चौधरी यांनी एमआयडीसी पोलीस ठाण्यात धाव घेवून तक्रार दिली. त्यांनी दिलेल्या तक्रारीवरून तीन जणांविरोधात एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Oct 30, 2023 12:22 PM IST









