advertisement

रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' मार्गावरील 30 पेक्षा अधिक ट्रेन रद्द

Last Updated:

भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी 14 व 15 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आला आहे. त्यामुळे तीसहून अधीक गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत.

News18
News18
भुसावळ, 14 ऑगस्ट :  भुसावळ रेल्वे मंडळातील भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी 14 व 15 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. तब्बल दोन दिवसाचा हा ब्लॉक असल्याने 13 ते 16 ऑगस्ट दरम्यान 30 पेक्षा अधिक रेल्वे गाड्या रद्द करण्यात आल्या आहेत. तर काही गाड्यांच्या मार्गात बदल करण्यात आला आहे. यामुळे या मार्गावरील प्रवाशांची मोठी गौरसोय झाली आहे.
भुसावळ रेल्वे मंडळातील भुसावळ ते मनमाड दरम्यान तिसऱ्या रेल्वे मार्गाच्या कामासाठी 14 व 15 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय. या मेगा ब्लॉगच्या पार्श्वभूमीवर आज अचानक   सकाळी सचखंड एक्प्रेसचा मार्ग बदलण्यात आला.  ही गाडी अकोला पूर्णामार्गे वळवण्यात आली, त्यामुळे मनमाड आणि छत्रपती संभाजीनगरकडे जाणाऱ्या प्राशांची प्रचंड गौरसोय झाली. शेकडो प्रवाशांना मध्येच उतरून इतर वाहनांनी प्रवास करावा लागला.
advertisement
प्रवाशांची गैरसोय  
मध्य रेल्वेने 183.94 किलोमीटर लांबीच्या भुसावळ मनमाड विभागदरम्यान नवीन तिसरा मार्ग बांधण्याचा महत्वाकांक्षी प्रकल्प हाती घेतला आहे. या कामासाठी 14 व 15 ऑगस्ट रोजी मेगा ब्लॉक घेण्यात आलाय आहे. या मेगा ब्लॉगचा मोठा फटका प्रवाशांना बसला आहे. भुसावळ ते मनमाड दरम्यानच्या तिसऱ्या मार्गावर इंटरलॉकिंग केल्यामुळे अनेक गाड्या रद्द झाल्या आहेत. त्यामुळे प्रवाशांचा खोळंबा झाला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
रेल्वे प्रवाशांसाठी महत्त्वाची बातमी; 'या' मार्गावरील 30 पेक्षा अधिक ट्रेन रद्द
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement