दोन दिवसांपासून गायब, जीभ छाटलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह? जळगावमधील खळबळजनक घटना!

Last Updated:

गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित तरुण जळगावातील मेहरुन तलावात मृतावस्थेत सापडला आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: गेल्या दोन दिवसांपासून बेपत्ता असलेल्या एका २१ वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळून आला आहे. संबंधित तरुण जळगावातील मेहरुन तलावात मृतावस्थेत सापडला आहे. धक्कादायक बाब म्हणजे मयत तरुणाची जीभ कापल्याचा संशय नातेवाईकांकडून व्यक्त केला जातोय. त्यामुळे तरुणाने आत्महत्या केली की त्याच्यासोबत घातपात घडला? याबाबत सस्पेन्स निर्माण झाला आहे.
ही धक्कादायक घटना उघडकीस येताच परिसरात एकच खळबळ उडाली आहे. पोलिसांनी मृतदेह ताब्यात घेऊन शवविच्छेदनासाठी पाठवला आहे. पोलीस घटनेचा पुढील तपास करत आहेत. शेख अबूजर शेख युनूस असं मृत आढळलेल्या २१ वर्षीय तरुणाचं नाव आहे. त्याच्या मृतदेहाची जीभ कापलेली असल्याचा संशय नातेवाईकांनी व्यक्त केला असून, हा घातपात असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
advertisement
मिळालेल्या माहितीनुसार, जळगावच्या बिलाल चौक परिसरातील तांबापुरा येथील रहिवासी असलेला अबूजर दोन दिवसांपूर्वी घरातून बाहेर पडला होता. मात्र परतला नाही. कुटुंबीयांनी त्याचा सर्वत्र शोध घेतला, पण तो सापडला नाही. अखेर, मेहरुन तलावात मासेमारी करणाऱ्या एका व्यक्तीला तलावात एक मृतदेह तरंगताना दिसला. ही माहिती मिळताच कुटुंबीय घटनास्थळी दाखल झाले आणि त्यांनी मृतदेहाची ओळख पटवली.
advertisement
अबूजरच्या अंगावर घरातून बाहेर पडतानाचे कपडे होते आणि खिशात त्याचा मोबाईलही सापडला. मात्र, मृतदेहाची अवस्था पाहून नातेवाईकांनी जीभ कापलेली असल्याचा संशय व्यक्त केला आणि हा घातपात असल्याचा आरोप केला. त्यांनी या प्रकरणाची सखोल चौकशी करण्याची मागणी केली आहे. पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून, या प्रकरणाचा पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
दोन दिवसांपासून गायब, जीभ छाटलेल्या अवस्थेत आढळला तरुणाचा मृतदेह? जळगावमधील खळबळजनक घटना!
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement