Jalgaon News : बैलगाडी घेऊन चारा आणायला गेला तो परतलाच नाही; 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jalgaon News :जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक बैलगाडी उलटल्याने झालेल्या अपघातात 13 वर्षीय मुलाचा मृत्यू झाला आहे.
जळगाव, (नितीन नांदूरकर, प्रतिनिधी) : शेतातून चारा घेवून येत असताना शेताच्या बंधाऱ्यावरून बैलगाडी जात असतांना अचानक उलटली. या अपघातात लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा डोक्यात घुसल्याने सातवीत शिकणारा 13 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. ही दुदैवी घटना सोमवारी 11 मार्च रोजी दुपारी अडीच वाजेच्या सुमारास जळगाव तालुक्यातील वाकडी गावानजीक घडली आहे. याप्रकरणी एमआयडीसी पोलीसात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. गौरव आंनदा पाटील (वय 13 रा. वाकडी) असे मयत झालेल्या मुलाचे नाव आहे.
शेतातून चारा आणत असताना बैलगाडी उलटली
गौरव पाटील हा सोमवारी दुपारी चारा आणण्यासाठी शेतात बैलगाडीने गेला होता. शेतात चारा घेवून येत असताना दुपारी अडीच वाजेच्या सुमारास बैलगाडी शेताच्या बांधावरून येत होती. त्यावेळी अचानक बैलगाडी उलटी झाला. यात बैलगाडीच्या कठड्याखाली गौरव दाबला गेला. त्यातच बैलांनी झटका दिल्याने लाकडी दुस्सर तुटली. यामुळे लोखंडी कठड्याला लावलेला लोखंडी विळा गौरवच्या कपाळात घुसला.
advertisement
घटनेत गौरव पाटील हा जागीच ठार झाला. शेतातजवळ असलेल्या काही शेतकऱ्यांनी घटनास्थळी धाव घेवून त्याला तातडीने जिल्हा रुग्णालयात दाखल केले. याठिकाणी वैद्यकीय अधिकाऱ्यांनी त्याला मयत घोषित केलं. मुलाच्या कुटुंबीयांनी रुग्णालयात मोठा आक्रोश केला.
दुचाकी विद्युत पोलवर धडकून मृत्यू
किराणा माल घेऊन घरी परतताना दुचाकी विद्युत पोलवर धडकून झालेल्या अपघातात दुचाकीस्वाराचा जागीच मृत्यू झाला. हा अपघात शिरसोली (ता.जळगाव) येथे घडला. कबीर भिवा चव्हाण (वय 44, रा. शिरसोली ता. जळगाव) असे मृत व्यक्तीचे नाव आहे. मृत कबीर हे एका खाजगी कंपनीत कामाला होते. ते शिरसोली गावात आई, पत्नी, 2 मुले, भाऊ यांच्यासोबत राहत होते. ते घरातील कर्ते पुरुष होते. त्यांच्या जाण्याने कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. एमआयडीसी पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली.
advertisement
देशात अपघाता मृत्यू होण्याचं प्रमाण दिवसेंदिवस वाढत आहेत. यावर शासनाकडून अनेक उपाययोजना केल्या जात आहेत. मात्र, त्यानंतर अपघात थांबण्याचं नाव घेताना दिसत आहे. त्यामुळे नागरिकांनीच आता स्वतःची काळजी घेत वाहन चालवण्याची गरज निर्माण झाली आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
March 11, 2024 7:43 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon News : बैलगाडी घेऊन चारा आणायला गेला तो परतलाच नाही; 13 वर्षीय मुलाच्या मृत्यूने खळबळ


