Jalgaon : कारने चौघांना चिरडले, 16 वर्षीय विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू; दोन गंभीर

Last Updated:

पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा गावाजवळ कारने चौघांना चिरडले.

News18
News18
जळगाव, 05 जानेवारी : भरधाव कारने चार ते पाच जणांना चिरडल्याची घटना पाचोरा तालुक्यातील गोराडखेडा इथं घडली. अपघातानंतर कार पलटी झाली. या अपघातात १६ वर्षांच्या विद्यार्थीनीसह ६० वर्षीय वृद्धाचा मृत्यू झाला. तर दोघे गंभीर जखमी झाले आहेत. अपघातातील जखमींना जळगाव जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल केलं आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, गुरुवारी सायंकाळी सहाच्या सुमारास पाचोऱ्याकडून भरधाव वेगात कार जळगावच्या दिशेने जात होती. तेव्हा गोराडखेडा गावाजवळ कारने चौघांना चिरडले. शाळा सुटल्यानंतर विद्यार्थी घरी जात होते तर शेजमजूर घराकडे परतत होते.
अपघातात दुर्वा पाटील, ऋतुजा भोईटे, सुभाष रामा पाटील, परशुराम पाटील यांना कारने चिरडले.
अपघात इतका भीषण होता की, गाडीने चौघांना चिरडल्यानंतर गाडी पलटी झाली. या अपघातात सुभाष पाटील आणि दुर्वा पाटील हे जागीच ठार झाले. अपघात गाडीने चौघांना धडक दिल्याने रस्त्याकडेच्या शेतात काही जण उडून पडले. तर गाडीतील तरुणांना पोलिसांनी ताब्यात घेत पोलीस स्टेशनला आणले. अपघातात परशुराम पाटील आणि ऋतुजा भोईटे हे जखमी झाले आहेत. परशुराम पाटील यांना उपचारासाठी जळगावला दाखल करण्यात आलंय.
advertisement
नाशिकमध्ये भीषण अपघात, ट्रक उलटल्याने कारसह ४ प्रवाशी अडकले
नाशिकमधून अपघाताची एक धक्कादायक बातमी समोर आली आहे. सुरत महामार्गावर लाकडाने भरलेला ट्रक एका कारवर उलटला आहे. या अपघातात कारमधील 4 प्रवाशी अडकले असल्याची माहिती समोर आली आहे. मिळालेल्या माहितीनुसार, नाशिकमधल्या सुरत महामार्गावर हा अपघात घडला आहे. आज दुपारच्या सुमारास ही विचित्र घटना घडली. गुजरात पासिंग असलेली हुंदुई कार ही ट्रकच्या खाली सापडली आहे.क्रेटा कार ही सापुतारा घाटातून जात होती. पण त्याचवेळी बाजूने जात असलेला ट्रक अनियंत्रित झाला आणि तो कारवरच कोसळला. अचानक घडलेल्या या घटनेमुळे कारमधील प्रवाशांना बाहेर पडता आलं नाही.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon : कारने चौघांना चिरडले, 16 वर्षीय विद्यार्थीनीसह वृद्धाचा मृत्यू; दोन गंभीर
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement