advertisement

जळगावात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट, भाड्याच्या घरात सुरू होता नको तो प्रकार, पोलिसांनी केला भांडाफोड

Last Updated:

Crime in Jalgaon: जळगाव शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका भाड्याच्या घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी जळगाव: जळगाव शहरातील न्यू स्टेट बँक कॉलनी परिसरात एक खळबळजनक घटना उघडकीस आली आहे. इथं एका भाड्याच्या घरात सुरू असलेल्या वेश्याव्यवसायाचा पोलिसांनी पर्दाफाश केला आहे. या कारवाईत पोलिसांनी एका दाम्पत्यासह तीन जणांना अटक केली आहे. तसेच एका पश्चिम बंगालच्या तरुणीची सुटका केली आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे.
रामानंद नगर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक राजेंद्र गुंजाळ यांना जळगाव शहरातील न्यू स्टेट बँग कॉलनी परिसरात एका भाड्याच्या घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची गुप्त माहिती मिळाली होती. या माहितीच्या आधारे त्यांनी पोलीस उपनिरीक्षक सचिन रणशेवरे यांच्या नेतृत्वाखाली एक पथक तयार केले. या पथकाने एक बनावट (डमी) ग्राहक पाठवून वेश्या व्यवसाय सुरू असल्याची खात्री केली.
advertisement
डमी ग्राहकाने घरात देहविक्रीचा व्यवसाय सुरू असल्याची खात्री केल्यावर पोलिसांना मिस कॉल देऊन इशारा केला. त्यानंतर, पोलिसांनी तत्काळ त्या दोन मजली घरावर छापा टाकला. या छाप्यात घरमालक दिनेश संजय चौधरी आणि त्याची पत्नी भारती चौधरी यांना ताब्यात घेण्यात आले. त्यांच्यासह आणखी तीन तरुणांना पोलिसांनी अटक केली आहे.
आरोपी दाम्पत्याने पश्चिम बंगालमधील एका तरुणीला जास्त पैशांचे आमिष दाखवून तिला जळगावला आणलं होतं. इथं तिच्याकडून देहविक्रीचा व्यवसाय करून घेतला जात होता. याप्रकरणी सर्व आरोपींविरोधात रामानंद नगर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा पुढील पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
जळगावात हाय प्रोफाइल सेक्स रॅकेट, भाड्याच्या घरात सुरू होता नको तो प्रकार, पोलिसांनी केला भांडाफोड
Next Article
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले? नाव ऐकून बसेल आश्चर्याचा धक्का!
एका रात्रीत भारतीयांनी ChatGPTचा नाद सोडला, मग कोणते App डाऊनलोड केले?
  • भारतीय धडाधड डाऊनलोड करतायत हे App

  • ॲपसाठी उडाली झुंबड

  • नाव वाचून थक्क व्हाल

View All
advertisement