Jalgaon Crime : शेतजमिनीचा वाद; शेजारीच ऐकमेकांच्या जीवावर उठले, विळा, दगड-विटांनी हल्ला, गुन्हा दाखल
- Published by:Rahul Punde
 
Last Updated:
Jalgaon Crime : पुनखेडा येथे शेत जमिनीच्या वादात एकमेकांवर विळ्याने हल्ला करण्यात आला. याप्रकरणी परस्पराविरुद्ध रावेर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
जळगाव, 30 सप्टेंबर (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : शेतमोजणीवरून कोर्टात दावा दाखल असलेल्या जागेवरुन विळ्याने हल्ला केला आहे. वादातील जागेत वखरणी का करतोस असा जाब विचारल्याचा राग आल्याने एकावर विळ्याने वार करून जखमी करण्यात आले. ही घटना पुनखेडा (ता रावेर) येथे घडली आहे. दगड, विटा व विळ्याने केलेल्या हाणामारीत सुभाष रामभाऊ पाटील व अमोल श्रीराम धनगर (दोघे रा. पुनखेडा) असे जखमी झालेल्यांचे नावे आहेत. दोघांनी परस्परांविरुद्ध दिलेल्या फिर्यादीवरून येथील पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
काय आहे प्रकरण?
पुनखेडा येथील सुभाष रामभाऊ पाटील व श्रीराम दलपत धनगर यांच्यात शेत जमिनीच्या मोजणीवरून कोर्टात दावा दाखल आहे. शुक्रवारी दुपारी श्रीराम धनगर सदर जागेत वखरणी करीत असल्याने सुभाष पाटील यांनी याबाबत धनगर यांना जाब विचारला. त्याचा राग आल्याने श्रीराम धनगर यांचा मुलगा अमोलने हातातील विळा सुभाष पाटील यांच्या डोक्यावर मारून दुखापत केली. तसेच मनोज पाटील यास श्रीराम धनगरने दगड पाठीवर मारून दुखापत केली अशी मनोज पाटील यांनी दिलेल्या तक्रारीत म्हटले आहे. तर याच घटनेत वखरणी करणाऱ्या श्रीराम धनगर यांना सुभाष पाटील यांनी दगड मारून दुखापत केली असून मनोज पाटीलने विळा मारून डोके फोडून दुखापत केल्याची फिर्याद अमोल धनगरने दिली आहे.
advertisement
वाचा - व्हिडिओ कॉलवर पत्नी आणि समोर गर्लफ्रेंड; दोघींच्या डोळ्यादेखत तरुणाने दिला जीव
याघटनेत दोन जण जखमी झाले असून त्यांच्यावर येथील ग्रामीण रुग्णालयात उपचार करून पुढील उपचारासाठी जळगाव जिल्हा रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक कैलास नागरे यांच्या मार्गदशनाखाली पोलीस कर्मचारी अर्जुन सोनवणे करीत आहेत.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
September 30, 2023 7:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jalgaon Crime : शेतजमिनीचा वाद; शेजारीच ऐकमेकांच्या जीवावर उठले, विळा, दगड-विटांनी हल्ला, गुन्हा दाखल


