जरांगे पाटलांचा महाजनांवर हल्लाबोल, म्हणाले ...तर जड जाईल
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
आज मनोज जरांगे पाटील हे जळगाव दौऱ्यावर होते, यावेळी बोलताना त्यांनी गिरीश महाजन यांच्यावर जोरदार निशाणा साधला.
जळगाव, 4 नोव्हेंबर, इम्तियाज अहमद : राज्यात मराठा आरक्षणाचा मुद्दा चांगलाच तापला आहे. मराठा आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी राज्य सरकारला आरक्षणासाठी चाळीस दिवसांचा वेळ दिला होता. मात्र आरक्षण न मिळाल्यानं ते पुन्हा एकदा उपोषणाला बसले होते. अखेर राज्य सरकारच्या शिष्टमंडळानं त्यांची भेट घेतल्यानंतर त्यांनी आपलं उपोषण मागे घेण्याचा निर्णय घेतला. मात्र त्याचबरोबर त्यांनी आता सरकारला आरक्षणासाठी 24 डिसेंबरची डेडलाईन दिली आहे.
मनोज जरांगे पाटील यांचा महाराष्ट्र दौरा सुरू आहे. ते आज जळगाव जिल्ह्यातील जामनेरमध्ये आहेत. यावेळी बोलताना त्यांनी मंत्री गिरीश महाजन यांच्यावर जोरदार हल्लाबोल केला आहे. 'लक्षात ठेवा तुम्ही पालकत्व स्विकारलं आहे. घटनेच्या पदावर तुम्ही बसला आहात, तुम्हाला मराठा समाजाविषयी आकस व्यक्त करता येणार नाही. तुम्ही मराठ्यांचा द्वेष करू शकत नाही. आमच्या जीवावर तुम्ही मोठे झाला आहात. छगन भुजबळ यांचं स्वप्न पूर्ण करण्यासाठी त्यांच्या पुढे-पुढे करू नका. भुजबळ यांचं ऐकूण आमच्यावर अन्याय कराल तर तुम्हाला जड जाईल असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.
advertisement
'ते पुढे बोलताना म्हणाले की, 'आरक्षणावरून तुम्ही राजकारण करू नका, अन्यथा ते देवेंद्र फडणवीस यांना सुद्धा अडचणीचं ठरू शकतं. सरकारशी आमचं बोलणं झालेलं आहे, तुम्हाला माहित नाही असं नाटक करू नका व नाटक कंपनीत तुम्ही सामील होऊ नका', असा हल्लाबोल मनोज जरांगे पाटील यांनी केला आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
December 04, 2023 2:49 PM IST


