Eknath Khadse : भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खडसेंचा खुलासा; म्हणाले, एका दिवसात...
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
दिल्लीला गेल्यानंतर एकनाथ खडसे हे भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता दिल्लीहून परतताच त्यांनी या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिलीय.
नितीन नांदुरकर, जळगाव : राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गटाचे नेते आमदार एकनाथ खडसे हे नुकतेच दिल्लीला गेले होते. यामुळे ते भाजपमध्ये प्रवेश करणार अशा चर्चा रंगल्या होत्या. आता दिल्लीहून परतताच त्यांनी या सर्व चर्चांवर प्रतिक्रिया दिलीय. पक्ष बदलण्याचा असा काही निर्णय एका दिवसात, एका क्षणात होत नसतो. कार्यकर्त्यांना, सहकाऱ्यांना विश्वासात घेऊनच असे निर्णय होत असतात असं खडसे यांनी म्हटलं
पक्षाने आपल्याला मदत केली तर पक्षाला विश्वासात घ्यायला पाहिजे. त्यामुळे अशी कुठलीही प्रक्रिया मी आतापर्यंत केलेली नाही. आता या सर्व प्रश्नांना मला पूर्णविराम द्यावासा वाटतो. जेव्हा केव्हा अशा संदर्भातला विषय तेव्हा मी त्याबद्दलची माहिती तुम्हा सर्वांना देईल. माझ्या एका केसची सुप्रीम कोर्टाची तारीख असल्याने मी दिल्लीला गेलो होतो असं स्पष्टीकरण एकनाथ खडसे यांनी चर्चांवर दिलं.
advertisement
दिल्लीला गेलो की अनेकांशी भेटी गाठी होत असतात. या भेटीगाठी नेहमीच होत असतात. मात्र यावेळी म्हणजेच काल दिल्लीला त्या भेटी होऊ शकलेल्या नव्हत्या असंही खडसे यांनी सांगितलं. गेल्या अनेक दिवसापासून एकनाथ खडसे भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. खडसे दिल्लीला गेल्यानंतर या चर्चेला वेग आला होता. मात्र यावर एकनाथ खडसे यांनी त्यांची भूमिका स्पष्ट करून या संपूर्ण चर्चांना तूतास पूर्णविराम दिला आहे.
advertisement
एकनाथ खडसे भाजप येण्यासाठी धडपड करत असल्याचे गिरीश महाजन आणि गेल्या काही दिवसांपूर्वी म्हटलं होतं त्याला खडसेंनी उत्तर दिलं असून गिरीश महाजन यांना टोला लगावला आहे. ते म्हणाले की, गेल्यावेळी मीच या प्रश्नाचे उत्तर दिलेल आहे मला प्रयत्न करण्याची आवश्यकता नसते. मला जर भाजपमध्ये यायचं असेल तर माझ्या वरिष्ठ पातळीवर मोदी, शहा, नड्डा यांच्याशी थेट संबंध आहेत. मला भाजपमध्ये जायचं असेल तर मी सर्वांना विश्वासात घेऊन जाण्याचा प्रयत्न करेल.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
April 03, 2024 11:43 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Eknath Khadse : भाजप प्रवेशाच्या चर्चेवर खडसेंचा खुलासा; म्हणाले, एका दिवसात...


