'...तर रावेरमधून लोकसभेसाठी मी उमेदवार'; खडसेंनी स्पष्टच सांगितलं
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
रावेर लोकसभा मतदारसंघाबाबत एकनाथ खडसेंकडून मोठा दावा करण्यात आला आहे.
जळगाव, प्रतिनिधी : राज्यात आगामी लोकसभा निवडणुकीच्या तयारीला सुरुवात झाली आहे. राज्यातील सध्याचं राजकीय वातावरण पाहाता महायुती आणि महाविकास आघाडीमधील कोणत्या घटक पक्षाला राज्यातील कोणती जागा येणार याबाबत मोठी उत्सुकता निर्माण झाली आहे. याच सर्व पार्श्वभूमीवर सध्या रावेर लोकसभा मतदारसंघ चर्चेत आला आहे. या मतदारसंघातून राष्ट्रवादीचे नेते एकनाथ खडसे यांच्या उमेदवारीची चर्चा सुरू आहे. या सर्व पार्श्वभूमीवर एकनाथ खडसे यांनी आता प्रतिक्रिया दिली आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे?
रावेर लोकसभेची जागा ही जर राष्ट्रवादीच्या वाट्याला आली तर मी उमेदवार असेल असं वक्तव्य एकनाथ खडसे यांनी केलं आहे. पुढे बोलताना ते म्हणाले की, जर रावेर लोकसभेची जागा काँग्रेसला मिळाली तर आम्ही इंडिया आघाडीच्या माध्यमातून काँग्रेसचा उमेदवार निवडून आणू. जागा ज्याच्या वाट्याला जाईल तो पक्ष या मतदारसंघातून आपला उमेदवार देईल. रावेर लोकसभा मतदारसंघासाठी सध्या विविध पक्षांमध्ये रस्सीखेच सुरू असताना एकनाथ खडसे यांनी ही महत्त्वपूर्ण प्रक्रिया दिली आहे.
advertisement
जळगावच्या जागेवर शिवसेनेचा दावा
दरम्यान दुसरीकडे शिवसेनेकडून जळगावच्या जागेवर दावा करण्यात आला आहे. जळगाव लोकसभेची जागा आम्हालाच मिळायला पाहिजे, या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही या मतदारसंघाकडे लक्ष आहे, असं शिवसेनेचे नवनियुक्त संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी म्हटलं आहे. तसेच या मतदारसंघासाठी इच्छूक असलेल्यांची नावं देखील त्यांनी सांगितली आहेत.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
January 08, 2024 11:16 AM IST


