advertisement

Maharashtra politics : चव्हाणांनतर आता नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाची चर्चा; खडसेंचा मोठा खुलासा, कार्यकर्त्यांनाही आवाहन

Last Updated:

अशोक चव्हाण आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत, मात्र दुसरीकडे एकनाथ खडसे देखील भाजपमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू झाली आहे. यावर खडसे यांनी खुलासा केला आहे.

News18
News18
जळगाव, इम्जियाज अहमद, प्रतिनिधी : माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांनी काँग्रेसचा राजीनामा दिला आहे. ते आज भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. हा काँग्रेसाठी मोठा धक्का मानला जात आहे. दरम्यान दुसरीकडे राष्ट्रवादी शरदचंद्र पवार पक्षाचे नेते एकनाथ खडसे देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची चर्चा सुरू आहे. यावर आता स्वत: एकनाथ खडसे यांनी ट्विट करत खुलासा केला आहे. 'माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा यासाठी अशा अफवा पसरविल्या जात आहेत' असं एकनाथ खडसे यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले खडसे? 
एकनाथ खडसे यांनी ट्विट करत आपल्या भाजप प्रवेशांच्या चर्चेबाबत खुलासा केला आहे.  'गेले काही दिवसापासून मी भाजपा मध्ये प्रवेश करणार, अशा आफवा माझ्याबद्दल संभ्रम निर्माण व्हावा, या हेतूने पसरविल्या जात आहेत. मी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार पक्षात आहे व राहणार. कार्यकर्त्यांनी, आणि नागरिकांनी अशा आफवांकडे दुर्लक्ष करावे.' असं ट्विट एकनाथ खडसे यांनी केलं आहे.
advertisement
advertisement
अशोक चव्हाणांचा आज भाजपात प्रवेश 
दरम्यान दुसरीकडे आज अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये अशोक चव्हाण आज भाजपात प्रवेश करणार आहेत. चव्हाण यांच्या पक्षप्रवेशाची भाजप कार्यालयात जोरदार तयारी करण्यात आली आहे. चव्हाण यांच्यासोबतच नांदेडचे काही माजी नगरसेवक देखील भाजपात प्रवेश करणार असल्याची माहिती समोर येत आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Maharashtra politics : चव्हाणांनतर आता नाथाभाऊंच्या भाजप प्रवेशाची चर्चा; खडसेंचा मोठा खुलासा, कार्यकर्त्यांनाही आवाहन
Next Article
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार, चालून आला गोल्डन चान्स
शेअर बाजाराच्या इतिहासातील सर्वात मोठी संधी, पैसे तयार ठेवा; 34 वर्षांनंतरची प्रतिक्षा पूर्ण होणार
  • गुंतवणूकदारांसाठी सर्वात मोठा जॅकपॉट

  • LIC आणि SBI कडून होणार शेअर्स विक्री

  • तुमचा वाटा मिळवण्यासाठी आतापासूनच प्लॅन करा

View All
advertisement