मराठा कार्यकर्ते म्हणून जरांगे पाटलांच्या ताफ्यात फिरायचे चोर, पोलिसांनी 5 जणांना केली अटक
- Published by:Suraj Yadav
Last Updated:
मनोज जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये पाकीट तसेच दागिन्यांची चोरी करणाऱ्या मालेगाव शहरातील पाच जणांच्या टोळीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे.
नितीन नांदुरकर, जळगाव, 07 डिसेंबर : मराठा आरक्षणासाठी मनोज जरांगे पाटील यांनी महाराष्ट्रातील अनेक भागात जाहीर सभा घेतल्या. पश्चिम महाराष्ट्र, मराठवाड्यानंतर आता जळगाव जिल्ह्यात त्यांच्या सभा होत आहेत. दरम्यान या सभांवेळी चोरीच्या घटना मोठ्या प्रमाणावर घडल्या. आता या प्रकरणी जळगाव पोलिसांनी मनोज जरांगे पाटील यांच्या सभांमध्ये चोऱ्या करणाऱ्या मालेगावमधील पाच जणांच्या टोळीला अटक केली आहे.
मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांच्या जळगाव जिल्ह्यात विविध ठिकाणी जाहीर सभा पार पडल्या. यात मनोज जरांगे पाटील यांच्या कॅनवामध्ये मराठा कार्यकर्ता असल्याच भासवत ते फिरायचे. सभांमध्ये पाकीट तसेच दागिन्यांची चोरी करणाऱ्या मालेगाव शहरातील पाच जणांच्या टोळीला जळगाव पोलिसांनी अटक केली आहे . या पाच जणांविरुद्ध भुसावळ व जामनेर पोलीस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.
advertisement
पोलिसांनी संशयीतांकडून एक चारचाकी, आठ मोबाईल व एक लाख ८० हजार रुपयांची रोकड असा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. मराठा समाजाचे कार्यकर्ते म्हणून पांढरे कपडे घालून मनोज जरांगे पाटील यांच्या कॅनवामध्ये चोर घुसायचे. पोलिसांनी अटक केल्यानंतर पाच जणांकडून चारचाकीसह , 1 लाख 80 हजारांची रोख, 8 मोबाईल हस्तगत केले आहेत.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 07, 2023 8:29 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
मराठा कार्यकर्ते म्हणून जरांगे पाटलांच्या ताफ्यात फिरायचे चोर, पोलिसांनी 5 जणांना केली अटक


