advertisement

नाकाबंदीवरील पोलीस पाहताच वळवली कार, मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग, जळगावमध्ये मोठा कांड उघड

Last Updated:

जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव परिसरात मध्यरात्री नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे.

News18
News18
विजय वाघमारे, प्रतिनिधी धरणगाव: जळगाव जिल्ह्याच्या धरणगाव परिसरात मध्यरात्री नाकाबंदीवर असणाऱ्या पोलिसांनी मोठी कारवाई केली आहे. पोलिसांनी एका कारचा पाठलाग करून कारमधून तब्बल ४० किलो गांजा जप्त केला आहे. रात्री पोलीसांनी संबंधित कारला रोखण्याचा प्रयत्न केला असता आरोपीने पळ काढला. कारमध्ये काहीतरी संशयास्पद असल्याचं लक्षात आल्यानंतर पोलिसांनी कारचा पाठलाग सुरू केला. यानंतर कारमध्ये पोलिसांना ४० किलो गांजा आढळून आला. पण यावेळी कारमधील दोघेजण अंधाराचा फायदा घेऊन फरार झाले.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, शनिवारी रात्री उशिरा पोलिसांनी चोपड्याकडून जळगावकडे येणाऱ्या मार्गावर नाकाबंदी केली होती. यावेळी एका संशयित कारला पोलिसांनी थांबण्याचा इशारा दिला. मात्र, चालकाने कार न थांबता घटनास्थळावरून वेगाने पळ काढला. पोलिसांनी लगेचच कारचा पाठलाग सुरू केला.
पोलिसांचा पाठलाग सुरू असल्याचे लक्षात आल्यावर कार चालकाने धरणगाव बस स्थानकाजवळून यू-टर्न घेतला आणि पारोळा रस्त्याकडे वळवली. पुढे झाडाझुडपांच्या आड कार सोडून दोन्ही आरोपी फरार झाले. पोलिसांनी कारची तपासणी केली असता, त्यात तब्बल ४० किलो गांजा सापडला, ज्याची किंमत अंदाजे १० लाख रुपये आहे. गांजा आणि कारसह एकूण २० लाख रुपयांचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला आहे.
advertisement
पोलिसांनी केलेल्या या पाठलागाचे थरारक दृश्य सीसीटीव्हीमध्ये कैद झाले आहे. फरार आरोपींचा शोध घेण्यासाठी पोलिसांची पथके रवाना झाली असून, पोलीस निरीक्षक सुनील पवार यांच्या मार्गदर्शनाखाली पुढील तपास सुरू आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
नाकाबंदीवरील पोलीस पाहताच वळवली कार, मध्यरात्री सिनेस्टाईल पाठलाग, जळगावमध्ये मोठा कांड उघड
Next Article
advertisement
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात; बारामतीच्या रनवेवर त्या दिवशी नेमकं काय घडलं?
अजितदादांचा विमान अपघात: हा निव्वळ दुर्दैव की व्यवस्थेने केलेला घात
  • बारामती अपघात हा शेवटचा इशारा

  • विमान वाहतूक सुरक्षेचे 'ऑडिट' आता तरी होणार का?

  • अजित पवारांचा अंत आणि उडालेली सुरक्षा यंत्रणा

View All
advertisement