यशोगाथा! जळगावच्या प्राध्यापकाचा नादच खुळा; कोरोनात नोकरी गेली सुरू केला भंगाराचा व्यवसाय, वर्षाला 40 ते 45 लाखांची उलाढाल

Last Updated:

नेट-सेट, पीएचडी झालेल्या प्राध्यापकानं चक्का भगांराचा व्यवसाय सुरू केला. या व्यवसायाच्या माध्यमातून ते आज वर्षाकाठी 40 ते 45 लाखांची उलाढाल करत आहेत.

News18
News18
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : कोरोना काळात अनेकांना आपला जीव गमवावा लागला, या काळात लावण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे सर्व उद्योगधंदे बंद असल्यामुळे अनेकांचा रोजगार देखील हिरावला गेला. आता जगायचं कसं असा प्रश्न त्यांच्यासमोर होता. मात्र त्यातील काही जणांनी खचून न जाता पुन्हा एकदा रोजगाराचं दुसरं साधन शोधून मोठी झेप घेतली, अशीच प्रेरणादायी गोष्ट जळगावमधून समोर आली आहे. नारायण अटकोरे हे नेट-सेट, पीएचडी झालेले प्राध्यापक आहेत. त्यांनी देखील कोरोनामध्ये नोकरी गमावली. त्यानंतर त्यांनी चक्क भगांराचा व्यवसाय सुरू केला. आज ते या व्यवसायातून महिन्याला लाखो रुपये कमवत आहेत.
जळगाव शहरातील नारायण अटकोरे हे पीएचडी, नेट सेट झालेले प्राध्यापक आहेत. त्यांनी 2009 मध्ये एका महाविद्यालयात विनाअनुदानित तत्वावर नोकरी सुरू केली. महाविद्यालयाला अनुदान येईल या आशेवर त्यांनी बारा वर्ष 3000 रुपये पगारावर काम केले. मात्र  तीन हजार रुपयांवर घर चालत नसल्यानं त्यांनी क्लास सुरू केले. तसेच ते संध्याकाळच्या वेळेस मिळेल ते काम करत होते. यातून ते महिन्याकाठी दहा हजार रुपये कमवत होते. त्यातून मुलांचे शिक्षण व घर खर्च ते भागवत होते. 2019 मध्ये कोरोना आला आणि संपूर्ण लॉकडाऊन झाले, यातच नारायण अटकोरे यांचीही नोकरी गेली. घरात दोन लहान मुले घर कसं चालवायचं असा त्यांच्या समोर मोठा प्रश्न होता. घरात विचार करत असताना एकदा घरासमोरून एक भंगारवाला गेला,आणि त्यांच्या मनात विचार आला आपण का हा भंगारचा व्यवसाय करू शकत नाही? त्यांनी त्या भंगारवाल्याला विचारले असता भंगारवाल्याने त्यांना सांगितले या व्यवसायातून काहीच परवडत नाही, तुम्ही या व्यवसायात पडू नका, मात्र त्यांच्या मनामध्ये जिद्द, चिकाटी होती त्यांनी भंगारचा व्यवसाय सुरू करायचा असा निश्चय केला.
advertisement
कोणताही व्यवसाय सुरू करताना आधी भांडवल लागते, प्राध्यापक नारायण अटकोरे यांच्याकडे भंगार व्यवसाय सुरू करण्यासाठी एक रुपयाही नव्हता. व्यवसाय तर सुरू करायचा मात्र पैसे आणायचे कुठून? त्यांनी याबाबत पत्नी प्रतिभा यांच्याशी चर्चा केली, मात्र पत्नीने हा व्यवसाय करण्यास नकार दिला. तुम्ही पीएचडी, नेटसेट झालेले प्राध्यापक आहात आणि हा भंगारचा व्यवसाय कसा करणार? समाज काय म्हणेल असा सवाल त्यांच्या पत्नीनं उपस्थित केला. मात्र तरी देखील ते हाच व्यवसाय करायचा यावर ठाम होते. नंतर पत्नीनं देखील होकार दिला. त्यांनी पत्नीचे दागिने मोडून व्यवसायासाठी पन्नास हजारांचं भांडवल जमा केलं आणि व्यवसाय सुरू केला.
advertisement
आधी एक छोटेसे भाड्याचे दुकान घेऊन पेपर आणि रद्दी विकत घेण्यास सुरुवात केली. त्यानंतर त्यांनी हळूहळू आपल्या व्यवसायाचा विस्तार केला. लॉकडाऊनमध्ये सर्व शाळा, महाविद्यालय, भाजीपाला, सामान यांची खरेदी विक्री हे सर्व ऑनलाईनच सुरू होतं, यातूनच त्यांना आपला व्यवसाय देखील ऑनलाईन करण्याची कल्पना सुचली. त्यांनी आपल्या व्यवसायासाठी एक वेबसाईट बनवली. तिला स्वतःचेच नाव नारायण दाजीबा अटकोरे (NDAऑनलाइन कबाडीवाला) असं नाव दिलं.  त्यांच्या या कल्पनेला नागरिकांनी देखील चांगला प्रतिसाद दिला.
advertisement
एक दहा बाय दहाच्या दुकानात सुरू झालेल्या या व्यवसायाचा विस्तार आता पाच हजार स्केअर फुट जागेपर्यंत पोहोचला आहे. त्यांनी स्व:ताची कंपनी सुरू केली आहे. नोकरीत दहा हजार कमवणारे प्राध्यापक नारायण अटकोरे हे आता वर्षीकाठी 40 ते 45 लाखांची उलाढाल करत आहेत. त्यांना हा व्यवसाय सुरू करून चार वर्ष झाली. या व्यवसायाचा आणखी विस्तार करणार असल्याचा मानस त्यांनी व्यक्त केला आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
यशोगाथा! जळगावच्या प्राध्यापकाचा नादच खुळा; कोरोनात नोकरी गेली सुरू केला भंगाराचा व्यवसाय, वर्षाला 40 ते 45 लाखांची उलाढाल
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement