Jamner Accident : जामनेरमध्ये बाबांच्या सायकलवरुन शाळेत जाणाऱ्या ज्ञानेश्वरीचा दुर्दैवी अंत, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको
- Published by:Rahul Punde
Last Updated:
Jamner Accident : अपघातानंतर संतप्त नागरिकांनी जळगाव छत्रपती संभाजीनगर मार्गावर रास्ता रोको आंदोलन केलं.
जळगाव, 8 डिसेंबर (इम्तियाज अहमद, प्रतिनिधी) : विविध उपाययोजना करुनही देशात अपघाताचे प्रमाण कमी होतना दिसत नाही. काही दिवसांपूर्वी जगात सर्वाधिक अपघाती मृत्यू भारतात होत असल्याची आकडेवारी समोर आली होती. मात्र, त्यानंतरही या घटना थांबायच्या नाव घेतना दिसत नाही. हजारो निष्पाप लोकांना अपघातात आपला जीव गमवावा लागत आहे. अशीच एक घटना जामनेर तालुक्यातील पहुर येथून समोर आली आहे. ट्रकने सायकलला धडक दिल्याने इयत्ता पाचवीतील विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला आहे.
जळगाव जिल्ह्यातील जामनेर तालुक्यातील पहुर येथे ट्रकने सायकलला धडक दिल्याने झालेल्या अपघातात पाचवी इयत्तेत शिकत असलेल्या विद्यार्थीनीचा जागीच मृत्यू झाला असून अपघातात मुलीचे वडीलदेखील जखमी झाले आहेत. ज्ञानेश्वरी भामरे असे अपघातात ठार झालेल्या विद्यार्थीनीचे नाव असून आपण स्वतः लिहिलेल्या कविता कवी संमेलनात सादर करण्यासाठी वडिलांच्या सायकलवर शाळेत जात असताना हा अपघात झाला. अपघातानंतर संताप झालेल्या नागरिकांनी पहूर बस स्थानक परिसरात रास्ता रोको आंदोलन करून प्रशासनाचा तीव्र निषेध व्यक्त केला आहे.
advertisement
अपघातवार
जळगाव जिल्ह्यातील पाचोराहुन जळगावकडे जाणाऱ्या चालत्या बसचे मागील चाक निखळले असून ही बाब चालकाच्या लक्षात आल्यानंतर तत्काळ गाडी थांबवून अपघात रोखला आहे. जळगाव जिल्ह्यातील शिरसोली-वावडदा रस्त्यावर हा प्रकार घडला असून प्रवाश्यांनी प्रचंड संताप व्यक्त केला आहे. पाचोरा आगराची बस ही पाचोऱ्याकडून जळगाव कडे जात असताना तसेच जळगावात सुरू असलेल्या शिवमहापुरान कथेच्या पार्श्वभूमीवर बस मध्ये प्रचंड गर्दी होती. अचानक चालत्या बसचे मागचे चाक बाहेर आल्याचा प्रकार चालकाच्या लक्षात आल्याने त्यांनी दाखवलेल्या सतर्कतेमुळे शेकडो प्रवाश्यांचे प्राण वाचले असून एसटी प्रशासनाच्या ढिसाळ कारभारचा फटका प्रवाश्यांना बसला आहे.
advertisement
कंटेनरमुळे ट्रॅफीक जाम
view commentsजळगावातील म्हसावदकडून जाणाऱ्या एका कंटेनरला वीज तारा अडथळा ठरत असल्यामुळे कंटेनर एकाच जागी थांबले. त्यामुळे या रस्त्यावरून जाणारी संपूर्ण वाहतूक ठप्प होऊन वाहनांच्या लांब लांब लांब लागल्याचे पाहायला मिळाले. कंटेनरमुळे वाहनधारकांना मोठा मनस्ताप सहन करावा लागला. आधीच या रस्त्यावर पुलाचे काम सुरू आहे तर दुसरीकडे कंटेनरला वळविण्यास पुरेशी जागा नसल्याने ते रस्त्यात अडकल्यामुळे वाहतुकीचा खोळंबा झाला. काही वेळाने नागरिकांनी मध्यस्थी केल्यानंतर तासाभराने वाहतूक सुरळीत झाली.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 08, 2023 8:37 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Jamner Accident : जामनेरमध्ये बाबांच्या सायकलवरुन शाळेत जाणाऱ्या ज्ञानेश्वरीचा दुर्दैवी अंत, संतप्त नागरिकांचा रास्ता रोको


