मोठी बातमी! जळगाव मतदासंघावर शिवसेनेचा दावा, इच्छूक उमेदवारांची नावंही सांगितली
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव लोकसभेच्या जागेवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे.
जळगाव, नितीन नांदूरकर, प्रतिनिधी : जळगावमधून मोठी बातमी समोर येत आहे. जळगाव लोकसभेच्या जागेवर शिवसेनेकडून दावा करण्यात आला आहे. जळगाव लोकसभेची जागा आम्हालाच मिळायला पाहिजे, या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचंही या मतदारसंघाकडे लक्ष आहे, असं शिवसेनेचे नवनियुक्त संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी म्हटलं आहे. तसेच या मतदारसंघासाठी इच्छूक असलेल्यांची नावं देखील त्यांनी सांगितली आहेत.
नेमकं काय म्हणाले सुनील चौधरी?
जळगाव लोकसभा मतदारसंघात आमचे चार ते पाच आमदार आहेत , काही जिल्हा परिषद सदस्य आहेत. त्यामुळे या लोकसभेच्या जागेसाठी आम्ही आग्रही आहोत. ही जागा आम्हालाच मिळाली पाहिजे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचेही या मतदारसंघाकडे वैयक्तिक लक्ष असून, आमच्या मनातलं आम्ही मुख्यमंत्र्यांना सांगणार आहोत, असं शिवसेनेचे संपर्कप्रमुख सुनील चौधरी यांनी म्हटलं आहे. ते जळगावात आयोजित पत्रकार परिषदेत बोलत होते.
advertisement
दरम्यान यावेळी त्यांना लोकसभेसाठी या मतदारसंघातून शिवसेनेकडू कोण इच्छूक आहे? याबाबत विचारले असता त्यांनी ज्येष्ठ नेते आमदार चिमणराव पाटील आणि जिल्हाप्रमुख निलेश पाटील यांचं नाव सांगितलं. मात्र सर्वानुमते जे ठरेल तो चेहरा आम्ही देऊ असंही ते पुढे म्हणाले. महायुतीकडून जळगाव लोकसभेसाठी शिवसेनेचा उमेदवार ठरला आणि त्यानंतर भाजपने त्यांचे उमेदवार दिले तर आम्ही काही कच्चे खिलाडी नाही असा इशाराही त्यांनी यावेळी दिला आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
January 08, 2024 8:15 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
मोठी बातमी! जळगाव मतदासंघावर शिवसेनेचा दावा, इच्छूक उमेदवारांची नावंही सांगितली


