आमचं सरकार म्हणजे वर भाजप, कंबर शिवसेनेचं अन् राष्ट्रवादी...; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य

Last Updated:

शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी विरोधकांवर टीका करताना मोठं वक्तव्य केलं आहे.

News18
News18
जळगाव, 28 ऑगस्ट, नितीन नांदूरकर : शिवसेनेचे मंत्री गुलाबराव पाटील यांनी पुन्हा एकदा राष्ट्रवादीचे नेते गुलाबराव देवकर यांच्यासह त्यांच्या समर्थकांवर नाव न घेता जोरदार निशाणा साधला आहे. आधी हेच राष्ट्रवादीवाले आमच्यावर 50 खोके एकदम ओके म्हणून टीका करत होते, आणि आता अजितदादा आमच्याकडे आले तर यांची बोलती बंद झाली असं गुलाबराव पाटील यांनी म्हटलं आहे.
नेमकं काय म्हणाले गुलाबराव पाटील? 
पुढे बोलताना गुलाबराव पाटील यांनी म्हटलं की, तुम्ही मंत्री असताना तरी एकच सरकार होते, मात्र आमचं तीन जनांचं सरकार आहे. वरती भाजप . कंबर शिवसेनेचं आणि हात पाय राष्ट्रवादीचे असं आमचं सरकार आहे. ते विविध विकासकामांच्या लोकार्पण आणि भूमिपूजन सोहळ्यात बोलत होते. यावेळी बोलताना त्यांनी जोरदार फटकेबाजी केली.
advertisement
चौफेर फटकेबाजी 
काही दिवसांपूर्वीच यांनी राष्ट्रवादीच्या अजित पवार गटासोबत गेलेल्या अनिल भाईदास पाटील यांचा सत्कार केला होता, आणि आता हे सांगतात की आम्ही शरद पवर यांच्या गटात आहोत. शरद पवारांच्या की अजित पवारांच्या आदेशाचं पालन करतात हे आधी सिध्द करा असं आव्हानही यावेळी गुलाराव पाटील यांनी नाव न घेता देवकर यांना केलं आहे. अनिल दादांचा सत्कार करणारे पण तुम्हीच. शरद पवार जिंदाबाद म्हणणारे पण तुम्हीच आणि विरोध करणारे पण तुम्हीच.  हे लोक स्टेबेल नाहीयेत असं पाटील यांनी म्हटलं आहे.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
आमचं सरकार म्हणजे वर भाजप, कंबर शिवसेनेचं अन् राष्ट्रवादी...; गुलाबराव पाटलांचं मोठं वक्तव्य
Next Article
advertisement
Bus fire: परत तीच अंधारी रात्र; ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू, काळजाचा थरकाप उडवणारा VIDEO
परत तीच अंधारी रात्र ट्रॅव्हल्सच्या बसने घेतला पेट, 20 प्रवाशांचा होरपळून मृत्यू
    View All
    advertisement