महिलेला बेशुद्ध करुन फेकलं विहिरीत, जळगावमधील धक्कादायक प्रकाराने खळबळ!
- Published by:Sayali Zarad
Last Updated:
जळगावमधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलीय. जळगाव शहरामध्ये एका महिलेला बेशुद्ध करून तिला विहिरीत टाकलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
नितीन नांदूरकर, जळगाव : जळगावमधून एक धक्कादायक घटना घडल्याचं समोर आलीय. जळगाव शहरामध्ये एका महिलेला बेशुद्ध करून तिला विहिरीत टाकलं. या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली आहे.
जळगाव शहरामध्ये एका महिलेला बेशुद्ध करून तिला शिरसोली गावातील विहिरीत फेकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. महिला सुखरूप असून ती रात्रभर विहिरीत बसून राहिली. दुसऱ्या दिवशी तिला नागरिकांच्या मदतीने विहिरीच्या बाहेर काढण्यात आलं.
advertisement
दीपिका दीपक पाटील (वय 26) असं सदर महिलेचे नाव असून ती जळगाव शहरातील रहिवासी आहे. महिला ही तिच्या मुलीला शाळेत घेण्यासाठी गेली होती या दरम्यान तिला अनोळखी महिला भेटली तिने तिला बेशुद्ध केलं. बेशुद्ध केल्यानंतर जळगाव शहरापासून काही अंतरावर असलेल्या शिरसोली गावातील एका विहिरीत महीलेला फेकून दिल्याची माहिती समोर आली.
advertisement
दरम्यान, घटनेची एमआयडीसी पोलीस ठाण्यात नोंद करण्यात आली आहे. सदर महिलेला गुंगवून विहिरीत टाकून देणारी ती महिला कोण आहे ? तिचा हेतू नेमका काय होता ? याबाबत एमआयडीसी पोलीस स्टेशन शोध घेत आहेत. घटना मार्गावरील विविध सीसीटीव्ही फुटेज तपासणीचे काम देखील पोलिसांनी सुरू केले आहे. या घटनेमुळे एकच खळबळ उडाली आहे.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
Jun 25, 2024 8:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
महिलेला बेशुद्ध करुन फेकलं विहिरीत, जळगावमधील धक्कादायक प्रकाराने खळबळ!










