लोकसभेला त्याग, विधानसभेला उमेदवारी, उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने माजी खासदार उन्मेश पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी उमेदवारी दिल्याची माहिती समोर येत आहे.
जळगाव : भारतीय जनता पक्षाने जळगाव लोकसभेला उमेदवारी नाकारल्याने तत्कालिन खासदार उन्मेश पाटील यांनी शिवसेना ठाकरे गटात प्रवेश केला. पक्ष बदलूनही त्यांनी उद्धव ठाकरे यांच्याकडे उमेदवारीचा आग्रह धरला नाही. आपल्या समर्थकाला तिकीट दिले तरी चालेल, अशी समंजसपणाची भूमिका घेऊन त्यांनी लोकसभा उमेदवारीचा त्याग केला. परंतु विधानसभेला तुम्हाला लढावे लागेल, अशी प्रेमळ सूचना ठाकरे यांनी उन्मेश पाटील यांना केली होती. उद्धव ठाकरे यांनी उन्मेश पाटील यांना विधानसभा उमेदवारीचा दिलेला शब्द पाळला आहे.
जळगाव जिल्ह्यातील चाळीसगाव मतदारसंघात शिवसेना ठाकरे गटाने माजी खासदार उन्मेश पाटील यांना विधानसभा निवडणुकीसाठी तिकीट दिल्याची माहिती समोर येत आहे. त्यामुळे चाळीसगाव विधानसभा मतदारसंघातून भाजपचे आमदार, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे निकटवर्तीय मंगेश चव्हाण यांच्याविरोधात दोन हात करतील.
उन्मेश पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईहून चाळीसगावकडे रवाना, सूत्रांची माहिती
सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, उन्मेश पाटील हे एबी फॉर्म घेऊन मुंबईहून चाळीसगावकडे रवाना झाले आहेत. त्यांच्या उमेदवारीची अधिकृत घोषणा लवकरच पक्षाकडून होणार असल्याचे सांगण्यात येत आहे.
advertisement
उन्मेश पाटील यांना शिवसेनेची उमेदवारी, शरद पवार गटाचे राजीव देशमुख नाराज, बंड करणार?
view commentsदुसरीकडे शिवसेना ठाकरे गटाने उन्मेश पाटील यांना उमेदवारी दिल्याने राष्ट्रवादी काँग्रेस शरद पवार गट कमालीचा नाराज झाला आहे. उन्मेश यांच्या उमेदवारीमुळे माजी आमदार तथा राष्ट्रवादी शरद पवार गटाचे नेते राजीव देशमुख हे बंड करणार का? याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. राजीव देशमुख यांनी विधानसभा निवडणूक लढण्याची तयारी केली होती.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
October 22, 2024 7:33 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
लोकसभेला त्याग, विधानसभेला उमेदवारी, उद्धव ठाकरेंनी दिलेला शब्द पाळला!


