राऊत म्हणाले उद्धवजी देशाचं नेतृत्व करतील, पण मला..; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी जळगावच्या सभेतून भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे.
जळगाव, 10 सप्टेंबर, लक्ष्मण घाटोळ : जळगावच्या सभेमधून आज पुन्हा एकदा शिवसेना ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी भाजप आणि शिवसेनेवर जोरदार हल्लाबोल केलं आहे. यावेळी बोलताना त्यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर देखील निशाणा साधला. केंद्र सरकारच्या एक देश एक नाव या भूमिकेवर त्यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. नशीब भारत तरी म्हणताय, नाहीतर स्वतःचे नाव देतात की काय असं वाटलं होतं असा खोचक टोला उद्धव ठाकरे यांनी लगावला आहे.
नेमकं काय म्हणाले उद्धव ठाकरे
दरम्यान याच सभेत बोलताना संजय राऊत यांनी मोठं वक्तव्य केलं होतं. वेळप्रसंगी उद्धव ठाकरे हे देशाचं नेतृत्व करतील असं ते म्हणाले होते. यावर बोलताना उद्धव ठाकरे यांनी म्हटलं की, संजय राऊत म्हणतात मी देशाचं नेतृत्व करेल, पण मला अशी वेडीवाकडी स्वप्न पडत नाहीत. मात्र देशासाठी जीव जळतो. मागे इंडियाची बैठक झाली तेव्हा मला अध्यक्षपद दिलं. ही मला नाही तुम्हाला दिलेली किंमत आहे, असं यावेळी उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
advertisement
दरम्यान एक सप्टेंबरला मुंबईमध्ये इंडिया आघाडीची बैठक झाली होती. या बैठकीपूर्वी मुंबईमध्ये शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे पोस्टर लावण्यात आले होते. या पोस्टवरून देखील उद्धव ठाकरे यांनी जोरदार हल्लाबोल केला आहे. ज्यांनी गद्दारी केली त्यांनी शिवसेनेची काँग्रेस होऊ देणार नाही असे बॅनर लावले, हो कधीच होऊ देणार नाही. मात्र आपण पण मग उत्तर दिलं, कमळाबाईची पालखी होऊ देणार नाही असं उद्धव ठाकरे यांनी म्हटलं आहे.
Location :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
September 10, 2023 3:09 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
राऊत म्हणाले उद्धवजी देशाचं नेतृत्व करतील, पण मला..; उद्धव ठाकरे स्पष्टच बोलले


