Vegetable rates : कांद्याचे दर कडाडले, लसूण 250 पार, पालेभाज्यांच्या भावातही मोठी वाढ
- Published by:Ajay Deshpande
Last Updated:
Vegetable Rates : पावसामुळे भाज्यांची आवक घटल्यानं दर चांगलेच कडाडले आहेत. आधीच वाढती महागाई आणि त्यात आता भाज्यांचे दर गगनाला भिडल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे.
भुसावळ, इम्तियाज अहमद, प्रतिनिधी : पावसामुळे भाज्यांची आवक घटल्यानं दर चांगलेच कडाडले आहेत. आधीच वाढती महागाई आणि त्यात आता भाज्यांचे दर (vegetables prices) गगनाला भिडल्यानं गृहिणींचं बजेट कोलमडण्याची शक्यता आहे. कांदा 40 तर लसूण तब्बल 250 रुपये किलोवर पोहोचला आहे. एकीकडे भाजीपाल्यांची आवक घटली आहे. तर दुसरीकडे मागणी वाढल्याचं चित्र आहे, त्यामुळे दरांमध्ये मोठी वाढ झाली आहे.
पावसाला झालेली सुरूवात आणि आवक कमी झाल्याने उन्हाळी कांद्याचे दर 40 रुपये किलोवर पोहोचले आहेत. केंद्र सरकारने कांद्याच्या निर्यातीवरील बंदी उठवली. पण काही अटी आणि शर्ती घातल्या. त्यामुळे कांद्याचे दर कमी होते. मात्र आता कांद्याच्या दरात मोठी वाढ होताना दिसत आहे.
बाजारात कांद्याचे घाऊक दर प्रतिकिलो 25 ते 30 रुपये होते. आता त्यात वाढ झाल्याने किरकोळ विक्रीवर परिणाम झाले. सध्या बाजारात चांगल्या प्रतीचा कांदा 40 रुपये तर दुय्यम प्रतीचा कांदा 35 रुपये किलोने विकला जात आहे. लसणाचे भाव तर प्रति किलो 250 रुपये पार पोहोचले आहेत.
advertisement
केवळ लसूण, कांदाच नव्हे तर हिरव्या भाजीपाल्याचे भावही वाढले आहेत. वाल शेंग 100, चवळी शेंग 120, हिरवी मिरची 120, वांगे 80, बटाटे 40, गावरान टोमॅटो 150 रुपये, अद्रक 160 रुपये प्रति किलो असे भाव आहेत.
महिन्याच्या सुरूवातीपासून बाजारात येणारा कांदा हा साठवलेला आहे. केंद्र सरकार कांद्यावरील निर्यात शुल्क हटवेल, अशी अपेक्षा शेतकऱ्यांना आहे. यामुळे चांगला भाव मिळेल या आशेवर शेतकऱ्यांनी कांदा साठवून ठेवला आहे. परिणामी बाजारपेठेत आवक कमी होऊन त्याचे परिणाम कांद्याच्या दरवाढीत झाल्याची माहिती विक्रेत्यांनी दिली.
view commentsLocation :
Jalgaon,Jalgaon,Maharashtra
First Published :
June 26, 2024 7:55 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
Vegetable rates : कांद्याचे दर कडाडले, लसूण 250 पार, पालेभाज्यांच्या भावातही मोठी वाढ


