advertisement

कपडे जळाले, मानेला लागलं अन् गेला जीव, दिवाळीची साफ-सफाई युवकाच्या बेतली जीवावर

Last Updated:

दिवाळीची साफ सफाई करताना एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला. ही घटना समोर येताच परिसरात एकच खळबळ उडाली.

दिवाळीची साफ-सफाई युवकाच्या बेतली जीवावर
दिवाळीची साफ-सफाई युवकाच्या बेतली जीवावर
जळगाव, 02 नोव्हेंबर : दिवाळी अगदी काही दिवसांवर येऊन ठेवपील आहे. सर्वत्र दिवाळीचा उत्साह पहायला मिळत असून मार्केटही पूर्णपणे दिवाळीच्या वस्तूंनी सजलं आहे. सर्वांच्या घरी दिवाळीची साफ-सफाई सुरु आहे. मात्र या आनंदाच्या वातावरणात एक धक्कादायक बातमी समोर आलीय. दिवाळीची साफ सफाई करताना एका तरुणाला आपला जीव गमवावा लागला.
फटाका विक्रेत्यानं घराची साफ सफाई करण्यासाठी पाठवलेल्या बालमजुराचा शॉक लागून मृत्यू झाला. काम करत असताना 17 वर्षीय मुलाचा पाय विजेच्या तारेवर पडला आणि शॉक बसून जागीच त्याचा जीव गेला.
समोर आलेली घटना भुसावळमधील मन्यारखेडा येथील आहे. सुनील चव्हाण नावाचा 17 वर्षीय तरुण मंगळवारी अनिल अग्रवाल यांच्या फटाक्याच्या दुकानात कामाला होता. अनिल यांनी त्याला घरी साफ सफाईसाठी पाठवलं. त्याच्यासोबत आणखी एक मुलगा साफ सफाईच्या कामासाठी आला होता. मोकळ्या प्लॉटमधील गवत काढताना त्याचा पाय विजेच्या तारेवर पडला. शॉक एवढा भयंकर लागला की, त्याचे कपडे जळाले आणि त्याच्या मानेलाही गंभीर दुखापत झाली. यानंतर सुनीलला रुग्णालयात नेण्यात आलं उपचारादरम्यान त्याचा जीव गेला.
advertisement
या घटनेनं परिसरात एकच खळबळ उडाली. कुटुंबियांनाही मोठा धक्का बसला. संपूर्ण कुटुंबीय मोलमजुरी करत असल्यानं सुनील हा मिळेल ते काम करून कुटुंबाला हातभार लावत होता.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/जळगाव/
कपडे जळाले, मानेला लागलं अन् गेला जीव, दिवाळीची साफ-सफाई युवकाच्या बेतली जीवावर
Next Article
advertisement
महाराष्ट्राच्या राजकारणात Deputy Chief Minister इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट; उपमुख्यमंत्री का ठरतो किंगमेकर!
राज्यात उपमुख्यमंत्री इतके पावरफुल का? संविधानात अधिकार शून्य, पण पॉवर अफाट
  • उपमुख्यमंत्री पण मुख्यमंत्र्यांचा तोडीस तोड

  • 'डेप्युटी सीएम' पदाची खरी ताकद नेमकी कशात

  • 'उपमुख्यमंत्री' पदाबद्दल काय सांगतं भारताचं संविधान

View All
advertisement