Eknath Khadse : '...म्हणून फडणवीसांनी माफी मागितली', एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण
- Published by:Shreyas
Last Updated:
जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. एकनाथ खडसे यांनी या मुद्द्यावरून देवेंद्र फडणवीस यांच्यावर निशाणा साधला आहे.
नितीन नांदूरकर, प्रतिनिधी
जळगाव, 4 सप्टेंबर : जालन्यामध्ये मराठा आंदोलकांवर झालेल्या लाठीचार्जचे पडसाद महाराष्ट्रात उमटले आहेत. राज्यभरात ठिकठिकाणी लाठीचार्जविरोधात आंदोलनं झाली, यातल्या काही आंदोलनांना हिंसक वळणही लागलं. या लाठीचार्जवरून विरोधकांनी सरकारला धारेवर धरलं आहे, यानंतर उपमुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी लाठीचार्जमध्ये जखमी झालेल्यांची क्षमा मागितली आहे, यावरून राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते एकनाथ खडसे यांनी फडणवीसांवर निशाणा साधला आहे.
advertisement
'महाराष्ट्र पेटून उठतोय ही भीती गृहमंत्र्यांना वाटली, म्हणून त्यांनी लाठीचार्ज केल्याबद्दल माफी मागितली. माफी मागायचीच होती तर घटना घडली तेव्हाच माफी मागितली असती, तर महाराष्ट्र पेटला नसता, जळला नसता. माफी मागायची सवय आता देवेंद्रजींना करावी लागेल. कारण धनगर आरक्षण पहिल्याच मंत्रिमंडळात देऊ ते अजून मिळालेलं नाही. ओबीसी आरक्षणाचा घोळ त्यांनी करून ठेवला आहे. प्रत्येक वेळी निवडणुका आल्या की मी तुम्हाला शब्द देतो, मंत्रिमंडळाच्या पहिल्या बैठकीत हा विषय आम्ही मंजूर करू, म्हणून सांगतात, पण दुर्दैवाने ते होऊ शकलं नाही, म्हणून अशी माफी मागण्याची वेळ राज्याच्या गृहमंत्र्यांवर आलेली आहे', अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली आहे.
advertisement
आमच्या तिघांपैकी कुणी लाठीचार्जचे आदेश दिले हे सिद्ध करून दाखवावं, जर सिद्ध केलं तर राजकारणातून बाजुला होईन, त्यांनी जर सिद्ध केलं नाही तर त्यांनी राजकारणातून बाहेर व्हावं, आहे का हिंमत,’ असं चॅलेंज अजित पवारांनी विरोधकांना दिलं, त्यावरूनही खडसेंनी प्रत्युत्तर दिलं.
'अजित पवार उपमुख्यमंत्री आहेत आणि त्यांना सर्व अधिकार आहेत हे त्यांनी आधी सिद्ध करावं. लाठी चार्ज केल्याच्या घटनेची जबाबदारी स्वीकारली पाहिजे. सर्व लाईव्ह टेलिकास्ट आहे, सिद्ध करण्याची काय गरज आहे?' असा सवाल एकनाथ खडसे यांनी विचारला आहे. शांततेच्या मार्गाने आंदोलन सुरू असताना लाठीचार्ज करायला लावणं, त्या करायच्या सूचना देणं आणि माफी मागावं लागणं ही सरकारच्या दृष्टीने नामुष्की आहे, अशी टीकाही खडसेंनी केली.
Location :
Jalgaon,Maharashtra
First Published :
Sep 04, 2023 8:27 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Eknath Khadse : '...म्हणून फडणवीसांनी माफी मागितली', एकनाथ खडसेंनी सांगितलं कारण









