Jowar-Bajra Price Hike: खाशील तर होशील, थंडीत ज्वारीला मागणी वाढली; प्रती क्विंटल 4 हजारापेक्षा जास्त भाव
- Published by:Chetan Bodke
- local18
- Reported by:Kale Narayan
Last Updated:
थंडीचा जोर वाढल्यामुळे सध्या सर्वत्र ज्वारीला मागणी वाढत आहे. परिणामी ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसांत नागरिक बाजरी आणि ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य देतात.
थंडीचा जोर वाढल्यामुळे सध्या सर्वत्र ज्वारीला मागणी वाढत आहे. परिणामी ज्वारीच्या दरात मोठी वाढ झाली आहे. हिवाळ्याच्या दिवसांत नागरिक बाजरी आणि ज्वारीची भाकरी खाण्यास प्राधान्य देतात. तसेच ज्वारीची आवक देखील अत्यंत कमी आहे. त्यामुळे जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत ज्वारीला विक्रमी 4200 रू. प्रती क्विंटल इतका दर मिळत आहे.
जालना कृषी उत्पन्न बाजार समितीत दररोज 2 ते 3 हजार रू. क्विंटल ज्वारीची आवक होत आहे. ही आवक मागणीच्या तुलनेत फारच कमी आहे. तसेच लोकांकडून या दिवसांत ज्वारीची भाकरी सेवन करण्याकडे कल पहायला मिळतो. त्यामुळे ज्वारीच्या दरात 300 रूपयांची वाढ झाली आहे. दगडी किंवा दुध मोगरा ज्वारीला बाजारात 3500 ते 4200 रू. प्रति क्विंटल असा दर मिळतोय.
advertisement
सर्वसाधारण ज्वारीचा दर हा 2500 ते 3500 रू. प्रती क्विंटल इतका आहे. दरम्यान ज्वारीला सध्या चांगला दर मिळत असल्याने शेतकरी ज्वारीची विक्री करू शकतात. असं आवाहन जालना येथील व्यापारी रमेश वाबळे यांनी 'लोकल 18'शी बोलताना सांगितलं. दरम्यान ज्वारी बरोबरच बाजरीचे दर देखील चढेच आहेत. जालना बाजारात बाजरीला 2500 ते 3500 रू. प्रती क्विंटल पर्यंत दर मिळत आहे. हिवाळ्यात ऊस तोड मजूर यांच्याकडून बाजरीला विशेष मागणी असते.
Location :
Maharashtra
First Published :
December 01, 2025 4:07 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Jowar-Bajra Price Hike: खाशील तर होशील, थंडीत ज्वारीला मागणी वाढली; प्रती क्विंटल 4 हजारापेक्षा जास्त भाव

