Gautami Patil: जितेंद्र आव्हाडांना गौतमीची भुरळ; पत्नीसमोरच म्हणाले, "त्याबद्दल मला ती खूप आवडते"
- Published by:Prachi Amale
Last Updated:
महाराष्ट्रातील प्रस्थापित वर्गाचा जो या नाचगाण्यावर पगडा होता, त्याला गौतमीने पहिल्यांदा धक्का दिला, असे जितेंद्र आव्हाड म्हणाले.
मुंबई : अवघ्या महाराष्ट्राला वेड लावणाऱ्या गौतमी पाटीलचा कार्यक्रम म्हटला की आजही प्रचंड गर्दीचा माहोल असतो. यात तिच्या अदाकारीने अनेकांनी भुरळ पाडली आहे. तरुणांना तर गौतमी पाटीलच भलतंच वेड असल्याचे व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतात. गौतमी पाटीलचं चक्क जितेंद्र आव्हाड यांनी कौतुक केलंय. तुझी अदाकारी चालू ठेव. महाराष्ट्रात अनेकांना तू आवडतेस असं जितेंद्र आव्हाड म्हणाले. तसेच गौतमी पाटीलविषयी विधानसभेत चर्चा झाली तेव्हा तिची बाजू घेणारा मी पहिला आमदार होतो, असंही ते म्हणाले. राष्ट्रवादी काँग्रेस नवी मुंबईचे जिल्हाध्यक्ष अन्नू आंग्रे यांनी दिघा येथे गौतमी पाटीलच्या लावणीचा कार्यक्रम आयोजित केला होता. त्यानेळी ते बोलत होते.
जितेंद्र आव्हाड म्हणाले, गौतमीने चांगल्या चांगल्यांना झोपवून स्वतःचं नाव केलं, त्याबद्दल मला ती खूप आवडते. तिच्या नाचाबद्दल वगैरे मला काही बोलायचं नाही. पण महाराष्ट्रातील प्रस्थापित वर्गाचा जो या नाचगाण्यावर पगडा होता, त्याला या पोरीने पहिल्यांदा धक्का दिला. जेव्हा आमच्या विधानसभेतही हिच्यावर चर्चा झाली. अनेकजण तिच्याविषयी बोलले. पण मला आठवतंय मी पहिला माणूस होतो, ज्याने उघडपणाने सांगितलं की एका गरीब घरातील मुलगी जर स्वतःच्या अदाकारीवर स्टेजवर पकड मिळवत असेल तिच्या पाठीशी उभं राहायला पाहिजे. तेव्हा मी तिच्या मागे पहिल्यांदा उभा राहिलो. आता ती मोठ मोठ्यांच्या मागे उभी राहते. तेव्हा ती विसरली की तिच्या मागे कोण उभं राहिलं नव्हतं. तीला आता कोणाच्या मागे उभे राहण्याची गरज पण नाही.
advertisement
महाराष्ट्रातील लोकांना तू आवडतेस : गौतमी पाटील
तुझी अदाकारी चालू ठेव. महाराष्ट्रातील लोकांना तू आवडतेस. तुझ्यासारख्या अनेक तारका ज्यांच्यामागे कुटुंबव्यवस्था नाही, जात नाही अशा मुलींनी स्टेजवर कब्जा मिळवला पाहिजे तरच महाराष्ट्राला खऱ्या अर्थाने सामाजिक न्याय मिळेल , असंही जितेंद्र आव्हाड म्हणाले.
Location :
Mumbai,Maharashtra
First Published :
March 23, 2025 7:17 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
Gautami Patil: जितेंद्र आव्हाडांना गौतमीची भुरळ; पत्नीसमोरच म्हणाले, "त्याबद्दल मला ती खूप आवडते"