मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस, कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात संजय शिरसाट यांच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात कालीचरण महाराज आले होते.
छत्रपती संभाजीनगर : हिंदूंमध्ये फूट पाडण्याचे इकडे एक आंदोलन सुरू होते. त्या आंदोलनाची खूप जोरदार हवा होती. मुंबईत तुफान गर्दी झाली होती. त्यांच्या नेत्याने दर्ग्यावर जाऊन चादर चढवली. जातीवरुन आरक्षण मागत होता. आरक्षण वगैरे नाही, त्याला हिंदुत्व तोडायचे होते. हिंदुत्व तोडायला निघालेला हा राक्षस आहे... असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज यांनी केले. मराठा आरक्षणासाठी गेली दोन वर्षे लढणारे मनोज जरांगे यांच्यावर केलेल्या टीकेने मराठवाड्यातील निवडणुकीची समीकरणे बदलणार का? हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.
विधानसभा निवडणुकीच्या प्रचाराच्या अखेरच्या टप्प्यात संजय शिरसाट यांच्या औरंगाबाद पश्चिम मतदारसंघात कालीचरण महाराज आले होते. विशाल हिंदू धर्मजागरण महासभेत बोलताना त्यांनी अनेक वादग्रस्त वक्तव्ये केली.
हिंदू मतदान करीत नाही म्हणून मुस्लिमांचे तळवे चाटणारा राजा होतो
दर पाच वर्षांनी निवडणूक होते आणि मतदानातून राजा ठरतो. राजा कसा असला पाहिजे, हे ठरवण्याचा अधिकार मतदारांचा आहे. मात्र भाजी आणि पेट्रोलच्या किंमतीसाठी मतदान करू नका. हिंदूंनो मोठ्या संख्येने धर्म वाचविण्यासाठी मतदान करा. तुम्ही लोक मतदानाला जात नाहीत. मग राजा कोण होणार, मुस्लिमांचे तळवे चाटणारा राजा होतो, असे वादग्रस्त वक्तव्य कालीचरण महाराज म्हणाले.
advertisement
मनोज जरांगे यांच्यावरील टीकेचा काँग्रेसकडून निषेध
view commentsमराठा आरक्षणासाठी लढणारे योद्धे मनोज जरांगे पाटील यांना राक्षस म्हणणाऱ्या कालीचरण यांचे वक्तव्य चुकीचे व निषेधार्ह आहे. कालीचरण यांची पाठीराखी महायुतीचा जाहीर निषेध! महाराज, संत, योगी या आदरणीय विशेषणांना साजेसे यांचे वर्तन वा वक्तव्य नसतात. भाजपा यांचा आपल्या ध्रुवीकरणाच्या अजेंड्यासाठी उपयोग करत असते, अशा शब्दात काँग्रेस प्रवक्ते सचिन सावंत यांनी भारतीय जनता पक्षाला लक्ष्य केले.
Location :
Aurangabad,Maharashtra
First Published :
November 18, 2024 4:16 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
मनोज जरांगे हिंदुत्व तोडण्यासाठी निघालेला राक्षस, कालीचरण महाराज यांचे वादग्रस्त वक्तव्य


