kalyan : भटका कुत्रा चावला, पण जखम किरकोळ समजून दुर्लक्ष केलं, तरूणाचा धक्कादायक मृत्यू
- Published by:Prashant Gomane
Last Updated:
भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,नाहीतर ते जीवघेणे ठरू शकते.कल्याणमधील घडलेली घटना त्याचं ताजं उदाहरण आहे. त्यामुळे कुत्र्याने चावल्यास तातडीने उपचार घ्या.
Kalyan News : एखादा भटका कुत्रा चावला की आपण लगेचच डॉक्टरकडे जाऊन इंजेक्शन घेतो. कारण त्या प्राण्याचे विष आपल्याला शरीरात जाऊ नये किंवा एखादा गंभीर आजार होऊ नये यासाठी आपण काळजी घेत असतो. पण या प्रकरणात एका तरूणाने कुत्रा चावल्याच्या घटनेकडे दुर्लक्ष केल्याने त्याचा दुदैवी मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. शूभम चौधरी असे या मृत तरूणाचे नाव आहे.शुभमच्या या मृत्यूनंतर कुटुंबियांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. या घटनेनंतर नागरीकांमध्ये संतापाची लाट पसरली असून शहरात भटक्या कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
कल्याण पश्चिमेतील गोल्डन पार्क इमारतीत शुभम चौधरी राहत होता. शुभम हा नोकरीच्या शोधात होतात. या दरम्यान त्याला एका भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली होती. इतकी गंभीर घटना घडून सुद्धा त्याने उपचार न घेता या घटनेकडे दुर्लक्ष केले होते. या घटनेला अनेक दिवस उलटल्यानंतर त्याला मांजराने देखील चावा घेतला होता. त्यानंतर त्याने य़ा घटनेकडे देखील दुर्लक्ष केले होते.
advertisement
अशात अचानक त्याची 10 डिसेंबरला प्रकृती खालावली.त्यामुळे त्याला कल्याणमधील खाजगी रूग्णालयात त्यानंतर कळवा आणि शेवटी कस्तुरबा रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. मात्र उपचार सूरू असतानाच त्याचा मृत्यू झाला. अचानक झालेल्या या मृत्यूने त्याच्या कुटुंबियांना मोठा धक्का बसला आहे. या घटनेनंतर मृत मुलाच्या कुटुंबियांनी माझ्या मुलाच्या मृत्यूला जबाबदार कोण? असा सवाल केला आहे. त्यासोबत या घटनेनंतर शहरात कुत्र्यांचा प्रश्न ऐरणीवर आला आहे.
advertisement
दरम्यान ही घटना पाहता भटक्या कुत्र्याने चावा घेतल्यास त्याकडे अजिबात दुर्लक्ष करू नका,नाहीतर ते जीवघेणे ठरू शकते.कल्याणमधील घडलेली घटना त्याचं ताजं उदाहरण आहे. त्यामुळे कुत्र्याने चावल्यास तातडीने उपचार घ्या.
Location :
Kalyan-Dombivli (Kalyan-Dombivali),Thane,Maharashtra
First Published :
December 13, 2024 9:22 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
kalyan : भटका कुत्रा चावला, पण जखम किरकोळ समजून दुर्लक्ष केलं, तरूणाचा धक्कादायक मृत्यू