Kolhapur: कोल्हापूरहून थेट 7 शहरांसाठी विमानसेवा, मुंबई, तिरुपती हवाई प्रवासाबाबत मोठं अपडेट

Last Updated:

Kolhapur Flight: कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. 15 मेपासून कोल्हापूरहून 7 मोठ्या शहरांना थेट विमानसेवा सुरू होणार आहे.

कोल्हापूरहून थेट 7 शहरांसाठी विमानसेवा, मुंबई, तिरुपती हवाई प्रवासाबाबत मोठं अपडेट
कोल्हापूरहून थेट 7 शहरांसाठी विमानसेवा, मुंबई, तिरुपती हवाई प्रवासाबाबत मोठं अपडेट
कोल्हापूर: कोल्हापूरकरांसाठी महत्त्वाची बातमी आहे. येत्या 15 मेपासून बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूर या मेट्रो शहरांसाठी थेट विमानसेवा सुरू होणार आहे. या नव्या सेवेमुळे कोल्हापूरची सात मेट्रो शहरांशी हवाई कनेक्टिव्हिटी निर्माण होणार असून, स्थानिक नागरिकांना प्रवासात मोठी सुलभता मिळणार आहे. नुकतेच याबाबत संजय घोडावत समुहाच्या स्टार एअरने याबाबत घोषणा केलीये.
सध्या स्टार एअर कोल्हापूरहून अहमदाबाद, मुंबई आणि तिरुपती या तीन शहरांसाठी आठवड्याला 16 उड्डाणे चालवते. 15 मेपासून बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूर या तीन नव्या मार्गांची भर पडणार असून, एकूण उड्डाणांची संख्या 28 पर्यंत वाढणार आहे. यापुढे 3 जून 2025 पासून ही संख्या आणखी वाढवून आठवड्याला 32 उड्डाणे करण्याचे नियोजन आहे. यामुळे कोल्हापूरहून अहमदाबाद, मुंबई, तिरुपती, बेंगळुरू, हैदराबाद, नागपूर आणि किशनगढ या सात शहरांसाठी थेट विमानसेवा उपलब्ध होणार आहे. विशेष म्हणजे, कोल्हापूरहून बेंगळुरू आणि मुंबईसाठी थेट विमानप्रवास आता ERJ-175 विमानांमधून बिझनेस क्लासच्या सुविधेसह करता येणार आहे.
advertisement
प्रवाशांसाठी सुधारित सुविधा
स्टार एअरने कोल्हापूर–मुंबई–कोल्हापूर आणि कोल्हापूर–अहमदाबाद–कोल्हापूर या विद्यमान मार्गांवरील विमानसेवेतही महत्त्वपूर्ण सुधारणा केल्या आहेत. यापूर्वी या मार्गांवर 50 आसनी ERJ-145 विमाने वापरली जात होती. आता 15 मेपासून या मार्गांवर 76 आसनी ERJ-175 विमाने वापरली जाणार आहेत. या नव्या विमानांमुळे प्रवाशांना अधिक आरामदायक प्रवासाचा अनुभव मिळेल. विशेषतः बिझनेस क्लासच्या सुविधेमुळे प्रवास अधिक सुखकर आणि आनंददायी होणार आहे. या बदलामुळे व्यावसायिक प्रवाशांसह सर्वसामान्य प्रवाशांनाही उच्च दर्जाची सेवा मिळणार आहे.
advertisement
कोल्हापूरच्या विकासाला चालना
या विस्तारामुळे कोल्हापूरचा मेट्रो शहरांशी हवाई संपर्क वाढणार असून, याचा थेट फायदा स्थानिक उद्योग, पर्यटन आणि शैक्षणिक क्षेत्राला होणार आहे. कोल्हापूर हे पश्चिम महाराष्ट्रातील महत्त्वाचे शैक्षणिक, सांस्कृतिक आणि औद्योगिक केंद्र आहे. बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूरसारख्या मेट्रो शहरांशी थेट हवाई जोडणीमुळे स्थानिक व्यावसायिकांना नव्या संधी उपलब्ध होतील. तसेच, पर्यटक आणि विद्यार्थ्यांना प्रवासात वेळेची बचत होईल. “हा विस्तार कोल्हापूरच्या विकासाला नवी दिशा देईल. आम्ही प्रवाशांना उच्च दर्जाची सेवा देण्यासाठी कटिबद्ध आहोत,” असे श्रेणीक घोडावत यांनी सांगितले.
advertisement
स्टार एअरचं यश..
स्टार एअरने गेल्या काही वर्षांत कोल्हापूरसह देशातील अनेक लहान शहरांना हवाई सेवांनी जोडले आहे. कमी खर्चात उच्च दर्जाची सेवा देण्याच्या धोरणामुळे स्टार एअरने प्रवाशांचा विश्वास संपादन केला आहे. या नव्या विस्तारामुळे स्टार एअरचा देशातील प्रादेशिक विमानसेवेतील पाया आणखी मजबूत होणार आहे. घोडावत समूहाचे अध्यक्ष संजय घोडावत यांनी स्टार एअरच्या सर्व कर्मचाऱ्यांचे या यशाबद्दल अभिनंदन केले आहे. “आमच्या कर्मचाऱ्यांच्या कठोर परिश्रमामुळे आणि प्रवाशांच्या पाठबळामुळे आम्ही हा टप्पा गाठू शकलो. यापुढेही आम्ही प्रवाशांना उत्तम सेवा देण्यासाठी प्रयत्नशील राहू,” असे संजय घोडावत यांनी नमूद केले.
advertisement
प्रवाशांसाठी काय आहे खास?
- बेंगळुरू, हैदराबाद आणि नागपूरसाठी थेट विमानसेवा.
- आठवड्याला 28 ते 32 उड्डाणे.
- ERJ-175 विमानांमधून बेंगळुरू आणि मुंबईसाठी बिझनेस क्लास सुविधा.
- 76 आसनी नवीन विमानांमुळे प्रवासात सुलभता आणि आराम.
-मेट्रो शहरांशी थेट जोडणीमुळे प्रवासाचा वेळ कमी.
कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब
हा विस्तार कोल्हापूरकरांसाठी अभिमानाची बाब आहे. स्टार एअरच्या या प्रयत्नांमुळे कोल्हापूर आता देशातील प्रमुख शहरांशी अधिक जवळ येणार आहे. स्थानिक नागरिकांनी या नव्या सेवांचा लाभ घ्यावा आणि कोल्हापूरच्या विकासात योगदान द्यावे, असे आवाहन स्टार एअरने केले आहे. येत्या काळात स्टार एअर आणखी नव्या मार्गांची घोषणा करू शकते, अशी शक्यताही वर्तवली जात आहे. सध्या तरी कोल्हापूरकरांसाठी हा एक सुवर्णकाळ आहे, जिथे हवाई प्रवास अधिक सुलभ आणि सुखकर होत आहे.
advertisement
संपर्क आणि बुकिंग
नव्या विमानसेवांचे तिकीट बुकिंग स्टार एअरच्या अधिकृत वेबसाइट आणि मोबाइल ॲपद्वारे सुरू झाले आहे. प्रवाशांना सवलतीच्या दरात तिकिटे उपलब्ध असून, लवकर बुकिंग करणाऱ्यांना विशेष ऑफर्स मिळणार आहेत. अधिक माहितीसाठी स्टार एअरच्या ग्राहक सेवा केंद्राशी संपर्क साधावा, असं आवाहन करण्यात आलंय.
view comments
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Kolhapur: कोल्हापूरहून थेट 7 शहरांसाठी विमानसेवा, मुंबई, तिरुपती हवाई प्रवासाबाबत मोठं अपडेट
Next Article
advertisement
BMC Election Result 2026 : मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की ठाकरे बंधू? पाहा कोण आघाडीवर
  • मुंबईचा पहिला कल हाती! महायुती की महाविकास आघाडी? पाह

  • मुंबई महानगरपालिकेच्या (BMC) सत्तेचा फैसला आज

  • सकाळी १० वाजता मतमोजणीला सुरुवात झाली

View All
advertisement