Ganeshotsav 2025: पुणे, कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांत तगडा बंदोबस्त, गणेश विसर्जनाआधी पोलीस अलर्ट
- Reported by:Patel Irfan Hassan
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Ganeshotsav 2025: अनंत चतुर्दशीच्या पार्श्वभूमीवर अनुचित प्रकार टाळण्यासाठी कोल्हापूर परिक्षेत्रातील पोलिसांनी कंबर कसली आहे. कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांत तगडा बंदोबस्त लावण्यात आला आहे.
कोल्हापूर: पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर परिक्षेत्रात गणेशोत्सव शांततेत पार पाडण्यासाठी पोलिसांनी मोठी कंबर कसली आहे. कोल्हापूर, सांगली, सातारा, पुणे ग्रामीण आणि सोलापूर ग्रामीणमध्ये अनंत चतुर्दशीनिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे. पाचही जिल्ह्यांत 27 हजारांवर मंडळांनी गणेश मूर्तीची प्रतिष्ठापना केली आहे. त्यामुळे सर्वत्र पोलिसांनी विशेष खबरदारी घेतली आहे, अशी माहिती कोल्हापूर परिक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी दिली.
पोलीस महानिरीक्षक फुलारी यांनी सांगितले की, “पश्चिम महाराष्ट्रातील पाचही जिल्ह्यांत पोलिस अधीक्षकांनी गेल्या दीड महिन्यापासून तयारी केली आहे. सर्व मंडळांसोबत समन्वयक म्हणून एका अंमलदाराची नियुक्ती केली आहे. मंडळ आणि पोलिस ठाण्याशी समन्वय ठेवण्यात येत आहे. एक दुवा म्हणून समन्वयक काम करीत आहेत. गणेशोत्सवासोबत ईद देखील साजरी होत आहे. शक्य त्या ठिकाणी मिरवणुका मागे-पुढे होतील, मिरवणुका समोरा समोर नाहीत, असे प्रयत्न आहेत. त्यास यशदेखील मिळत आहे.”
advertisement
गुन्हेगारांवर कारवाई
सक्रिय गुन्हेगार, अवैध धंदेवाले, अमली पदार्थाची तस्करी करणाऱ्यांवर कारवाई करण्यात आली आहे. संघटित गुन्हेगारांवर कारवाई करण्यात येत आहे. आवाजाच्या मर्यादेचे पालन करावे, तसेच कुठे प्रतिबंधक कारवाई केली आहे. शांततेत गणेशोत्सव साजरा करण्यासाठी पोलिस प्रशासनाला सर्वच मंडळांनी सहकार्य करावे, असे आवाहन विशेष पोलीस महानिरीक्षक सुनील फुलारी यांनी केले.
Location :
Kolhapur,Maharashtra
First Published :
Aug 31, 2025 8:13 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/कोल्हापूर/
Ganeshotsav 2025: पुणे, कोल्हापूरसह 5 जिल्ह्यांत तगडा बंदोबस्त, गणेश विसर्जनाआधी पोलीस अलर्ट








